शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 13:18 IST

नवी मुंबईत बहिणीला एका मुलासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या भावाने आणि वडिलांनी त्याची हत्या केली आहे.

Navi Mumbai Crime :नवी मुंबईतून एका १८ वर्षीय मुलाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नवी मुंबईपोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघेही पिता पुत्र आहेत. घरात बहिणीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या बाप लेकाने १८ वर्षीय मुलाची हत्या केली. या सगळ्या प्रकारामुळे नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.

वडिलांसोबत मिळून भावाने बहिणीच्या १८ वर्षीय प्रियकराची हत्या केल्याचा प्रकार नवी मुंबईतील टाऊनशिप येथे घडला. रविवारी दुपारच्या सुमारास आरोपीच्या बहिणीने तिच्या प्रियकराला घरी बोलावले होते. मात्र भाऊ आणि वडिलांना हा प्रकार समजात त्यांनी १८ वर्षीय तरुणाच निर्घृणपणे हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि  मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिल्याची माहिती तळोजा पोलिसांनी दिली. 

समीर अब्दुल शेख (१८)  असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. समीरच्या मैत्रिणीने त्याला रविवारी दुपारी तरुणीने पनवेल येथील देवाचा पाडा येथे घरी बोलवले होते. मात्र त्याचवेळी तरुणीचा भाऊ कामावरून लवकर घरी पोहोचला. त्याने दरवाजा ठोठावला असता त्याच्या बहिणीने तो उघडला नाही. आरोपीने दरवाजा तोडला असता त्याला त्याची बहीण प्रियकर समीर अब्दुल शेख (१८) याच्यासोबत सापडली. त्याचवेळी आरोपी भावाने याने तात्काळ वडिलांना फोन करुन बोलवून घेतले. त्यानंतर दोघांनी घरातील लोखंडी फावडे व कुऱ्हाडीने वार करत समीर शेखचा खून केला. या मारहाणीत समीरचा जागीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी दोघांविरोधात भारतीय दंडसहिता ३०२ आणि ३४ अंतर्गंत गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

वाढदिवसाचा केक उशीरा आणल्याने पत्नी, मुलावर चाकूने हल्ला

मुंबईच्या साकीनाका परिसरात वाढदिवसाचा केक उशीरा आणल्यामुळे ४५ वर्षीय व्यक्तीने पत्नी व मुलावर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी राजेंद्र शिंदेविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी पत्नी व मुलावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस