नवी मुंबई को-आॅप बँकेला पुरस्कार

By Admin | Updated: August 25, 2015 00:58 IST2015-08-25T00:58:05+5:302015-08-25T00:58:05+5:30

दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मुंबई यांनी २०१३-१४ करिता आयोजित केलेल्या उत्कृष्ट अहवाल आणि कामकाज स्पर्धेत नवी मुंबई को-आॅप बँकेला ३०० कोटी

Navi Mumbai Co-op Bank Award | नवी मुंबई को-आॅप बँकेला पुरस्कार

नवी मुंबई को-आॅप बँकेला पुरस्कार

नवी मुंबई : दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मुंबई यांनी २०१३-१४ करिता आयोजित केलेल्या उत्कृष्ट अहवाल आणि कामकाज स्पर्धेत नवी मुंबई को-आॅप बँकेला ३०० कोटी रुपयांपर्यंत ठेवी असणाऱ्या बँका या गटात द्वितीय पारितोषिक देण्यात आले.
नुकत्याच झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा चषक नवी मुंबई को-आॅप बँकेला प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने जनमानसात आणि बँकेच्या ग्राहकवर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी दि बृहन्मुंबई नागरी सरकारी बँक्स असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष दत्ताराम चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी सी. बा. अडसूळ, संचालक अभिजित अडसूळ, किशोर रांगणेकर, संदीप घनदाट, नवी मुंबई को-आॅप बँकेचे अध्यक्ष मधुर हांडे, माजी अध्यक्ष लक्ष्मण गटकळ, संचालक शरद अभंग, श्याम महाडिक, प्रकाश चौधरी, विजय कदम, एम. वाय. कांबळे, नितीन टिल्लू यांनी चषक स्वीकारला.
(वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Navi Mumbai Co-op Bank Award