शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूरमध्ये 'त्या' रिक्षाचालकामुळे वाचला ५५ रहिवाशांचा जीव; दुसऱ्या नोकरीने वाचवले लोकांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:00 IST

नवी मुंबईच्या बेलापुरमध्ये तीन मजली इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे.

Belapur Building Collapses : नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये १० वर्षापूर्वीची इमारत कोसळल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. बेलापूरमध्ये शहाबाज गावात शनिवारी इंदिरा निवास ही बेकायदा अनधिकृत इमारत कोसळून तीन जणांचा बळी गेला तर दोनजण जखमी झाले. दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीमधील ५५ जण सुखरूप बाहेर पडले. एका रिक्षाचालकामुळे या ५५ जणांचा जीव वाचला आहे. रिक्षा चालकामुळे वेळीच सावधान केल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. इतरवेळी अपमानास्पद वागणूक देणाऱ्या रिक्षाचालकाचे आता जीव बचावलेले नागरिक आभार म्हणत आहेत. शहाबाज गावातील इंदिरा निवास ही इमारत दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत अचानक कोसळली. यात मोहम्मद मिराज, शफील अन्सारी आणि मिराज अन्सारी यांचा मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. रिक्षाचालक आकाश बाबूच्या सतर्कतेमुळे या अपघातातून ५५ जण वाचले आहेत. इमारतीच्या तळमजल्यावरील हेअर सलूनमध्ये झोपणाराआकाश बाबू शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास आला होता. त्यावेळी त्याला पहिल्या मजल्यावरून जोरात खडखडाट ऐकू आला होता.

"हा सगळा प्रकार पाहून मी धावत जाऊन लोकांना उठवण्यास सुरुवात केली. इथले रहिवासी सुरुवातीला घर सोडण्यास तयार नव्हते. तळमजल्यावरील एका महिलेने माझा इशाराही धुडकावून लावला होता. काही मिनिटांनंतर, त्या महिलेचे कुटुंब बाहेर आले आणि त्यांनी इमारत कोसळलेली पाहिली. पहिल्या मजल्यावरील रहिवाशांनी माझ्या सल्ल्याचे पालन केले आणि ते पटकन बाहेर पडले. मी आरडाओरडा केल्यानंतर अनेक रहिवासी बाहेर निघून आले," असे आकाश बाबूने सांगितले.

दोन बहिणींच्या लग्नात झालेले कर्ज फेडण्यासाठी आणि उरलेल्या चौघांच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी आकाश बाबू रिक्षा चालवण्यासोबत दर रविवारी सलूनमध्ये काम करायचा. त्या दिवशी रविवारच्या कामासाठी तो सलूनमध्ये झोपला आणि ही घटना घडली. आधी माझ्या दारु पिण्याच्या सवयीमुळे इथले रहिवासी माझ्याशी बोलणे टाळायचे. आता त्यांनी माझे कौतुक करायला सुरुवात केली आहे," असे आकाश बाबू म्हटलं आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघातBuilding Collapseइमारत दुर्घटना