शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

नवी मुंबई विमानतळाचे ८ ऑक्टोबरला उद्घाटन; दीड ते दोन महिन्यांनी विमान वाहतूक सेवा होणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 07:36 IST

तब्बल ११६० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांची सेवा पुरविण्याची क्षमता आहे. अंतिम टप्प्यात ती ९० दशलक्षपर्यंत वाढणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबरला लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. ही घटना विकसित भारताच्या उत्तुंग झेपेचे प्रतीक ठरेल. महाराष्ट्राच्या आर्थिक शक्तीला नवे पंख लाभतील, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक  विजय सिंघल यांनी शनिवारी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

हा विमानतळ देशातील सर्वांत मोठ्या ग्रीनफिल्ड प्रकल्पांपैकी एक ठरला आहे. तब्बल ११६० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांची सेवा पुरविण्याची क्षमता आहे. अंतिम टप्प्यात ती ९० दशलक्षपर्यंत वाढणार आहे. यामुळे तीन वर्षांत १५ ते १८ हजार रोजगार निर्माण होतील, तर पुढील दोन दशकांत हा आकडा एक लाखांवर जाईल. उद्योगधंदे, व्यापार, पर्यटन, आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात नवी संधी निर्माण होणार आहे, असे ते म्हणाले. 

आधुनिक तंत्रज्ञानाची काससाडेतीन दशलक्ष टनांहून अधिक मालवाहतुकीची तरतूद, दोन समांतर धावपट्ट्या, कमलपुष्पावर आधारित अद्वितीय वास्तुरचना, स्वयंचलित पीपल मुव्हर प्रणाली आणि भूमिगत नेटवर्कद्वारे जोडले जाणारे चार टर्मिनल्स यामुळे हे विमानतळ आधुनिक तंत्रज्ञानाचे द्योतक ठरेल.  

डिसेंबरमध्ये पहिले व्यावसायिक उड्डाण ८ ऑक्टोबर रोजी विमानतळाचे उद्घाटन होईल. त्यानंतर व्यावसायिक संचलनासाठी सुरक्षिततेची बाब म्हणून त्याचा ताबा सीआयएसएफकडे दिला जाईल. साधारण दीड ते दोन महिन्यांनी अर्थात डिसेंबरमध्ये येथून कार्गो आणि प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होईल, असे सिंघल यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport Inauguration on October 8; Flights in December

Web Summary : Navi Mumbai International Airport's first phase, a greenfield project, opens October 8. It will handle 20 million passengers annually initially, expanding to 90 million. Expect 15,000+ jobs within three years; cargo and passenger flights begin in December.
टॅग्स :Airportविमानतळ