रंगोत्सवाला होणार नैसर्गिक रंगांची उधळण

By Admin | Updated: March 12, 2017 02:47 IST2017-03-12T02:47:41+5:302017-03-12T02:47:41+5:30

इको फ्रेंडली सण साजरे करण्याचा ट्रेंड वाढत असून बाजारात नैसर्गिक रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पर्यावरणपूरक रंगांच्या किमतीदेखील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या

Natural color fluctuations to be held in color | रंगोत्सवाला होणार नैसर्गिक रंगांची उधळण

रंगोत्सवाला होणार नैसर्गिक रंगांची उधळण

नवी मुंबई : इको फ्रेंडली सण साजरे करण्याचा ट्रेंड वाढत असून बाजारात नैसर्गिक रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पर्यावरणपूरक रंगांच्या किमतीदेखील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असल्याने या रंगांना चांगलीच पसंती मिळत आहे. आरोग्यदायी होळी आणि धूळवड साजरी करण्यासाठी विविध प्रकारांत तसेच सुगंधित रंग खरेदीसाठी उपलब्ध आहे.
पारंपरिक रंगांबरोबरच हर्बल कलर, हर्बल गुलाल खरेदी करता येतील. लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा अशा विविध रंगांबरोबर हर्बल रंगांमध्ये चंदेरी व सोनेरी रंगही उपलब्ध आहेत. या धूळवडीसाठी वेलवेट प्रकारचे रंग लोकिप्रय आहेत. विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेले हे रंग मऊ, मखमली असून, त्यांचा पोत हे खास आकर्षण आहे. नैसर्गिकरीत्या तयार केलेले व पर्यावरणपूरक रंग साधारण किमतीत उपलब्ध आहेत. हर्बल कलरव्यतिरिक्त यंदा फळांच्या फ्लेवरमध्ये रंग उपलब्ध असून, त्यात फ्रेश लेमन, ग्रीन अ‍ॅपल, स्ट्रॉबेरी, आॅरेंज इत्यादी प्रकारांचा पर्याय आहे. दोनशे रु पयांपासून पुढे हे रंग उपलब्ध रंगांचा पोत आणि फ्लेवरच्या आकर्षणाबरोबरच ही धूळवड सुगंधित करता येईल, यासाठी बाजारात सुगंधित रंगही उपलब्ध आहेत. बाजारात असलेले रंग स्प्रे, ट्यूब, पावडर स्वरूपात उपलब्ध आहेत. रंगांच्या किमती वाढलेल्या असल्या, तरी रंगांमध्ये असलेले नावीन्य यामुळे रंग खरेदी जोरात असल्याचे विक्रे त्यांचे मत आहे.

प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्यांवर कारवाई करा
रंगोत्सवासाठी पाण्याचे फुगे तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या विकणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. प्लास्टिक पिशव्या विकणारा विक्रेता आढळल्यास त्या दुकानदाराकडून दंडवसुली करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

बच्चे कंपनींसाठी पिचकाऱ्या
या रंगपंचमीच्या सणासाठी बच्चे कंपनीने बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, चायनामेड पिचकाऱ्या खरेदी करण्याकडे बच्चे कंपनीचा कल दिसून येतो. बच्चे कंपनीची खासियत असलेल्या या ‘वॉटर गन्स’ची पाण्याची क्षमता वाढली आहे. ३५०पासून ते १५००
रु पयांपर्यंत या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत. छोटा भीम, डोरेमॉन, मिनी-मिकी, टॉम कॅट, अँग्री बर्ड्स, निन्जा, बेन टेन अशा कार्टुन्सच्या आहेत. पाठीवर दप्तर किंवा सॅकसारख्या टांगता येतील अशा पिचकाऱ्या १०० रु पयांपासून पुढे खरेदी करता उपलब्ध आहेत.

Web Title: Natural color fluctuations to be held in color

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.