नवी मुंबई विमानतळ साईटवर दिबांच्या नावाचे फलक; शासनाला दिबांच्या नावाची आठवण करून दिली
By वैभव गायकर | Updated: August 9, 2023 14:48 IST2023-08-09T14:48:03+5:302023-08-09T14:48:10+5:30
ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून बुधवार दि.9 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आहे.

नवी मुंबई विमानतळ साईटवर दिबांच्या नावाचे फलक; शासनाला दिबांच्या नावाची आठवण करून दिली
पनवेल- ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून बुधवार दि.9 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आहे. शासनाकडून नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटीलांचे नाव देण्यास उशीर होत असल्याने दिबा पाटील विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने हे फलक लावून शासनाला दिबांच्या नावाची आठवण करून दिली.
यावेळी कृती समितीचे दशरथ पाटील,माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकुर,माजी खासदार संजीव नाईक,माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपास्थित होते.विमानतळ साईटवर तीन मोठं मोठे फलक लावून या लोकनेते दिबा पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ असे नावं देण्यात आले.महाराष्ट्र शासनाकडून दि बा पाटील नामकरणाचा मंजूर ठराव केंद्र शासनाकडे पाठवून त्याला मान्यता मिळविण्याची औपचारिकता बाकी असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे याकरिता प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने एकवटले आहेत.
या करीता अनेक वेळा मोर्चे तसेच आंदोलने प्रकल्पग्रस्तांनी यापूर्वीच केलेली आहेत.यावेळी दिबांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या.