कल्याणमध्ये लॉजिंगच्या नावाखाली कुंटणखाना
By Admin | Updated: November 1, 2014 00:59 IST2014-11-01T00:59:07+5:302014-11-01T00:59:07+5:30
लॉजिंग आणि बोर्डीगच्या नावाखाली कुंटणखाना चालविणा:या कल्याण येथील लॉजच्या व्यवस्थापकासह पाच जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण पथकाने अटक केली आहे.

कल्याणमध्ये लॉजिंगच्या नावाखाली कुंटणखाना
ठाणो : लॉजिंग आणि बोर्डीगच्या नावाखाली कुंटणखाना चालविणा:या कल्याण येथील लॉजच्या व्यवस्थापकासह पाच जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण पथकाने अटक केली आहे. या कारवाईनंतर सात महिलांची सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण शीळ रोड मानपाडा येथील ‘रुची लॉजिंग अॅन्ड बोर्डीग’च्या लॉजमध्ये महिलांकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय होत असल्याची टीप वरीष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे 28 ऑक्टोंबरला रात्री या लॉजमध्ये बनावट गि:हाईक पाठवून पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी सात महिलांकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय केला जात असल्याचे आढळले. त्यामुळे लॉजचा व्यवस्थापक संतोष शेट्टी आणि त्याचे दोन सहकारी तसेच दोन गि:हाईक अशा पाच जणांवर पिटांअंतर्गत कारवाई केली.
शेट्टी याच्यासह पाच जणांना 1 नोव्हेंबर्पयत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुटका केलेल्या महिलांना उल्हासनगरच्या सुधारगृहात ठेवले आहे. लॉजिंगचा असा बेकायदेशीर वापर केल्यामुळे या लॉजचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याची माहिती धुमाळ यांनी दिली. (प्रतिनिधी)