नालेसफाईला मुहूर्त मिळेना

By Admin | Updated: May 12, 2017 01:58 IST2017-05-12T01:58:25+5:302017-05-12T01:58:25+5:30

पनवेल महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे अद्याप मान्सूनपूर्व

Nalasefai got a chance | नालेसफाईला मुहूर्त मिळेना

नालेसफाईला मुहूर्त मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे अद्याप मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात झालेली नाही.
पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना सिडकोच्या वतीने अद्याप मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झाली नसल्याने नागरिकांमधे नाराजी आहे. एकीकडे शहरातील गटारे, नाल्यांची सफाईची कामे शिल्लक आहेत तर दुसरीकडे प्रचाराच्या धामधुमीत राजकीय नेत्यांकडूनही नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
साधारण ७ जूनला मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी सिडको प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे होणे अपेक्षित असते. मात्र अद्याप काम सुरूच न झाल्याने ते पूर्ण होणार कधी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहरात सेक्टर १२, १०, २, १५, २१, १३ याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. दरवर्षी ही कामे मे अखेरीस पूर्णही केली जातात. मात्र अद्याप ही कामे हाती घेतली नसल्याने सिडको प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. शहरात काय ठिकाणी गटारे भरल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. खारघर सेक्टर १० मधील हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. तक्रार करून देखील दखल घेतली नसल्यामुळे रहिवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Nalasefai got a chance