शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत पालिका राबविणार नाला व्हिजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:24 IST

पावसाचे पाणी वसाहतीमध्ये जाऊ नये, यासाठी दुरुस्तीची कामे प्रस्तावित केली आहेत. याशिवाय सर्व होल्डिंग पॉण्डचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : शहरातील ७८ किलोमीटर लांब ४४ पावसाळी नाल्यांची एकत्रित सुधारणा करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. पावसाचे पाणी वसाहतीमध्ये जाऊ नये, यासाठी दुरुस्तीची कामे प्रस्तावित केली आहेत. याशिवाय सर्व होल्डिंग पॉण्डचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.खाडीचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी सिडकोने ११ ठिकाणी होल्डिंग पॉण्ड (धारण तलाव) तयार केले आहेत. जवळपास २०० हेक्टर क्षेत्रामध्ये हे तलाव असून, ते शहराची संरक्षण भिंत म्हणून ओळखले जातात; परंतु मागील २५ वर्षांमध्ये तलावामधील गाळ काढला नसल्यामुळे त्यांची साठवण क्षमता कमी होऊ लागली आहे. तलावांमध्ये खारफुटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे गाळ काढता येत नाही. काढ काढण्याची परवानगी मिळावी, यासाठी पालिकेने न्यायालयात परवानगी मागितली आहे; परंतु त्याविषयी अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. बुधवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीमध्ये सीबीडीमधील नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी या विषयाकडे लक्ष वेधले. गतवर्षी पावसाळ्यामध्ये अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. ऐरोली, वाशी व इतर ठिकाणीही परिस्थिती गंभीर आहे. महापालिका प्रशासनाने धारण तलावामधील खारफुटी इतर ठिकाणी हलवून त्यांची साफसफाई करावी. त्यासाठी न्यायालयाकडून विशेष परवानगी मिळवावी, अशी मागणीही त्यांनी केली. पुढील वर्षी पावसाचे पाणी वसाहतीमध्ये शिरले तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. दिव्या गायकवाड, सलुजा सुतार, रवींद्र इथापे यांनीही हा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी मागणी केली. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी होल्डिंग पॉण्ड व पावसाळी नाल्यांची सुधारणा करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर सादर केला असून, तेथे मंजुरी मिळाली की पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पावसाळी पाणी वाहून नेणारे एकूण ४४ नाले आहेत. या नाल्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. एमआयडीसीमध्ये बोनसरी परिसरात गतवर्षी पावसाचे पाणी वसाहतीमध्ये शिरल्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले होते. यामुळे सर्वच प्रभागांमधील लोकप्रतिनिधींनी नाला व्हिजन राबविण्याची मागणी केली आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरात ४४ नाले असून, त्यांची लांबी ७८.२७ किलोमीटर आहे. नाल्यांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी डेब्रिजचे ढिगारे पडले आहेत. यामुळे नाल्यांमधील अडथळे दूर करावे. आवश्यक त्या ठिकाणी गॅबियन वॉल पद्धतीने संरक्षण भिंत तयार करण्याचे प्रस्तावित केले आहे. सर्वसाधारण सभेमध्ये बुधवारी हा विषय मांडण्यात येणार होता; परंतु त्यामध्ये काही सुधारणा करावयाची असल्यामुळे तो पुढील सभेमध्ये सादर करण्यात येणार आहे.>धारण तलावांची माहितीनाव क्षेत्रबेलापूर सेक्टर १२ ५.५बेलापूर सेक्टर १५ अ १३.८५वाशी सेक्टर ८अ २.३वाशी गाव १.९३वाशी सेक्टर १० अ १५वाशी सेक्टर १२ २४नाव क्षेत्रकोपरखैरणे सेक्टर १४ ०९ऐरोली सेक्टर १८ १६ऐरोली सेक्टर १९ १४वाशी रेल्वे स्टेशन मागे ७७सानपाडा सेक्टर ३० अ २२>नाल्याचे नाव लांबीएमआयडीसी नाला सानपाडा ५,५६०जिग्ना आॅर्गनिक ब्रांच २१०हर्डिलीया जवळील नाला १,८३०जुईनगर रेल्वे स्टेशन १,४३०चिंचोली तलाव ३२०वाशी सेक्टर १२ ३,९३४ब्रांच ६ २,७५०सेंट्रल नाला १,१०८वाशी गाव २६०आर्टिस्ट व्हिलेज २,३५०आर्टिस्ट नाला ब्रांच ३५०मँगो गार्डन नाला १,८१०बेलापूर रेल्वे स्टेशन ९००नाल्याचे नाव लांबीटाटा पॉवर ते पामबीच नाला २,५५०एअर इंडिया कॉलनी नाला ७५०खैरणे नाला ३,९००कोपरखैरणे क्रशर ५००अमर बिटूमेन कंपनीजवळील नाला १,३७५पाण्याची टाकीजवळील झोपडपट्टी ८५०कैलाश उद्यान ६००पावणे नाला १,८००खैरणे ब्रांच १ ते ४ ७,१४९नोसील नाला घणसोली ४,२१५घणसोली ब्रांच १ ते ४ ५,००५इलठाण पाडा नाला ८५०सेंच्युरी नाला १,२१०नाल्याचे नाव व लांबीभारत बिजली नाला १,५६५गवतेवाडी नाला ४२०ऐरोली सेक्टर २० १३०ऐरोली सेक्टर १४ २३०महापे नाला १,३६०पॉयशा नाला १,२००रिलायबल फॅशन नाला १,५००कोपरखैरणे नाला सेक्टर २ १,६१०कोपरखैरणे सेक्टर १३ १,५७०गोठवली गावाजवळील नाला ८९०अमृत धाम ७३०>ऐरोलीमध्येही लोकप्रतिनिधींचा पाठपुरावाऐरोलीमधील होल्डिंग पॉण्डचीही दुरवस्था झाली आहे. तलावामध्ये गाळ साचला असून खारफुटी वाढली आहे. येथील गाळ काढावा व परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी नगरसेविका संगीता पाटील, अशोक पाटील यांनीहीमहापालिकेकडे केली आहे. यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला आहे; परंतु अद्याप त्यास यश आलेले नाही.