शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नाईक समर्थक माजी नगरसेवकांचा भाजपला रामराम; गवते कुटुंबीयांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 23:26 IST

गवते कुटुंबीयांचा शिवसेनेत प्रवेश

नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकांची चाहूल लागताच भाजपला पुन्हा खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. दिघा येथील नाईक समर्थक माजी नगरसेविका अपर्णा गवते, दिपा गवते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये  मंगळवारी शिवबंधन बांधले. दिघा परिसरामध्ये गवते कुटुंबीयांचे तीन प्रभागांमध्ये वर्चस्व आहे.

गवते कुटुंबीय आतापर्यंत माजी मंत्री गणेश नाईक यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. नवीन गवते यांनी स्थायी समितीचे सभापतीपदही भूषविले आहे. काही महिन्यांपासून गवते कुटुंबियांच्या पक्षांतराविषयी चर्चा सुरु होत्या. अखेर मंगळवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेविका अपर्णा गवते, दिपा गवते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी, करण मढवी उपस्थित होते. शिवबंधन बांधण्याच्या वेळी माजी सभापती नवीन गवते उपस्थित नव्हते. ते बाहेरगावी असून लवकरच तेही शिवबंधन बांधणार असल्याचे बोलले जात आहे. गवते कुटुंबीयांच्या पक्षांतरामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

आठवड्यापूर्वी गुन्हा दाखल

दिघात राहणाऱ्या अभंग शिंदे यांच्या तक्रारीवरून माजी सभापती नवीन गवते यांच्यावर २३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे हे पूर्वी गवते यांचे कार्यकर्ते होते. परंतु मतभेद झाल्यामुळे त्यांनी सेनेत प्रवेश केला. गुन्हा दाखल केल्यानंतर एक आठवड्यात नवीन गवते कुटुंबातील दोन माजी नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका