मुस्लीम मतदारांना अमिन ‘पटेल’ का?
By Admin | Updated: September 21, 2014 00:57 IST2014-09-21T00:57:10+5:302014-09-21T00:57:10+5:30
लोकसभा निवडणुकीत आघाडी राखण्यात यशस्वी ठरलेल्या आमदार अमिन पटेल यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.

मुस्लीम मतदारांना अमिन ‘पटेल’ का?
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या 2क्क्9 सालच्या विजयानंतर लोकसभा निवडणुकीत आघाडी राखण्यात यशस्वी ठरलेल्या आमदार अमिन पटेल यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. कारण गेल्या वर्षी महायुतीचा सहज पराभव करणा:या पटेल यांना यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह एआयएमआयएम या ओवेसी बंधूंच्या पक्षाच्या उमेदवाराचे कडवे आव्हान असणार आहे.
मुस्लीम समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात गेल्या वेळी मनसेने उमेदवार दिला नव्हता. तेव्हा पटेल यांनी शिवसेनेच्या अनिल पडवळ यांचा सुमारे 17 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. यंदा मनसे या ठिकाणी उमेदवार उभा करणार असल्याची चर्चा सुरू होताच, शिवसेनेच्या गोटात मराठी मतांच्या विभाजनाची अस्वस्थता पसरली होती.
इम्तियाज अनिस यांच्या रुपात मनसेने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लीम समाजात अनिस यांचा चांगला संपर्क आहे.
गेल्या वेळी येथील मुस्लीम मतदारांना महायुती आणि आघाडीशिवाय तिसरा पर्याय नव्हता. शिवाय मनसेच्या नावावर त्यांना काही प्रमाणात का होईना, पण मराठी मते मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
1मनसेतर्फे या ठिकाणी इम्तियाज अनिस या मुस्लीम चेह:यास संधी दिल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर ओवेसी बंधूंच्या एआयएमआयएम पक्षातर्फेही लवकरच या ठिकाणी उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.
2परिणामी दोन मुस्लीम चेह:यांमुळे येथील मुस्लीम समाजाच्या मतांत विभाजन होऊन त्याचा थेट फटका पटेल यांना बसणार आहे.
3शिवाय थोडय़ा प्रमाणात का होईना, पण मनसेच्या आगमनाने या ठिकाणी मराठी मतांचेही विभाजन होईल. त्यामुळे येथील एकतर्फी मानली जाणारी लढत मनसे आणि ओवेसींमुळे रंगतदार झाली आहे.