अनैतिक संबंधावरून चुलत्याचा खून

By Admin | Updated: October 18, 2014 21:57 IST2014-10-18T21:57:31+5:302014-10-18T21:57:31+5:30

अनैतिक संबंधच्या कारणावरून पुतण्याने चुलत्याचा खून केला. याप्रकरणी 9 तासात मनोर पोलिसांनी फरार आरोपीला गजाआड केले.

The murderer's blood from immoral relationships | अनैतिक संबंधावरून चुलत्याचा खून

अनैतिक संबंधावरून चुलत्याचा खून

मनोर : अनैतिक संबंधच्या कारणावरून पुतण्याने चुलत्याचा खून केला. याप्रकरणी 9 तासात मनोर पोलिसांनी फरार आरोपीला गजाआड केले. तर या भांडणात पडलेला एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
मनोर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विलसेत येथील कैलास बालु पुंजारा याचे गावातच एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. त्याची माहिती विo्राम गोपळ पुंजारा याला होती. त्याने या दोघांना एकत्र पाहिलेही होते. त्यामुळे विo्राम गावात चर्चा करेल किंवा संबंधित महिलेच्या पतीला सांगेल, अशी भीती कैलासला वाटत होती. त्याचा काटा काढण्यासाठी कैलासने 17 ऑक्टोबरला रात्री 9 च्या सुमारास विo्रामला फोन करून गावाजवळच्या चिंचेच्या झाडाजवळ बोलावून त्याच्या गळय़ावर, डोक्यावर, तोंडावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला जागीच ठार केले. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी दत्ता पुंजारा गेला असता त्याच्यावरही वार केले परंतु तो वाचला. पोलिसांनी  घटनास्थावरून मृतदेह ताब्यात घेतला. मनोर पोलीस ठाण्यात 3क्2, 3क्7 प्रमाणो गुन्हा दाखल झाला 

 

Web Title: The murderer's blood from immoral relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.