पुण्यातील मारणो गँगच्या म्होरक्याला अटक
By Admin | Updated: December 12, 2014 02:14 IST2014-12-12T02:14:05+5:302014-12-12T02:14:05+5:30
पुणो येथील अमोल बधे हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेल्या मारणो गँगच्या म्होरक्यांना कामोठे पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले.

पुण्यातील मारणो गँगच्या म्होरक्याला अटक
ेनवी मुंबई : पुणो येथील अमोल बधे हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेल्या मारणो गँगच्या म्होरक्यांना कामोठे पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले. गोळीबार प्रकरणानंतर राजस्थानला पळत असताना कामोठे येथे चहा पिण्यासाठी उतरले असताना त्यांना अटक करण्यात आली.
अटक केलेल्यांपैकी गजानन मारणो ऊर्फ महाराज (49) हा मारणो गँगचा म्होरक्या आहे. तसेच त्याचा साथीदार रुपेश मारणो (31) हा देखील पुण्यामधील गंभीर गुन्हय़ातील आरोपी आहे. पुण्यातील पौड व विश्रमबाग पोलीस ठाण्यात मारणो गँगवर 116 गंभीर गुन्हय़ांची नोंद आहे. यापैकी गजानन मारणो याच्यावर 18 गुन्हे दाखल असून रुपेश मारणो याच्यावर 11 गुन्हय़ांची नोंद आहे. अमोल बधे याची पुण्यात हत्या केल्यानंतर दोघे जण राजस्थानला पळून जात होते.
कामोठे येथील वेंकट प्रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये दोघे जण आपल्या साथीदारासह चहा पिण्यासाठी उतरले होते. पोलिसांना संशय आल्यानंत त्यांना पकडण्यात आले. चौकशीनंतर हे आरोपी मारणो गँगचे हस्तक असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या बॅगमधून दोन धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या दोघांव्यतिरिक्त तिसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.