शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

टपरीमाफियांना पालिकेचा दणका, मोक्याच्या ठिकाणची अतिक्रमणे हटविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 12:59 IST

विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या पिवळ्या, निळ्या टपऱ्या  हटविल्या आहेत. तर बेवारस वाहने, अनधिकृत बॅनरही हटविण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : महामार्गासह मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या टपरीमाफियांविराेधात महानगरपालिकेने मोहीम उघडली आहे. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या पिवळ्या, निळ्या टपऱ्या  हटविल्या आहेत. तर बेवारस वाहने, अनधिकृत बॅनरही हटविण्यास सुरुवात केली आहे. मार्जिनल स्पेसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांनाही नोटिसा दिल्या आहेत. पालिकेच्या मोहिमेमुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

स्वच्छता अभियानात देशात तिसरा नंबर मिळविणाऱ्या नवी मुंबईत आता अतिक्रमणमुक्त शहर मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाचे उपायुक्त राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरभर कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. सायन - पनवेल महामार्गावर वाशी ते नेरूळदरम्यान बसथांब्याच्या बाजूला विनापरवाना अनधिकृत टपऱ्या सुरू झाल्या होत्या.

टपरीमाफियांच्या वर्षानुवर्षांच्या अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यास सुरुवात झाली आहे. मनपाच्या पथकाने सर्व टपऱ्या उचलण्यास सुरुवात केली आहे. यंत्राच्या साहाय्याने टपऱ्या उचलून डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात येत आहेत. अतिक्रमणाचे पिवळे, निळे साम्राज्य खालसा झाले आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना निराविक्री केंद्रे सुरू झाली होती. याशिवाय रात्री आइसक्रीम विक्रेत्यांनीही अनेक ठिकाणी व्यवसाय सुरू केला होता. या गाड्या उचलण्यासही सुरुवात केली आहे. 

नागरिकांकडून स्वागतउपायुक्त राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या मोहिमेचे नागरिकांनीही स्वागत केले आहे. अनेक अनधिकृत पानटपरी चालक महानगरपालिकेच्या परवानगीचा फलक लावून व्यवसाय करीत होते. महामार्गावरही जागा अडविली होती. बेवारस वाहनांमुळे शहर स्वच्छतेला अडसर निर्माण झाला होता. मनपाने सर्व विभागांत कारवाई सुरू केल्यामुळे सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.     रस्त्यांवरील बेवारस वाहनांमुळे शहर स्वच्छतेमध्ये अडसर येऊ लागला होता. अनेक महिने रिक्षा, कार व इतर वाहने रस्त्यावर उभी करून ठेवली आहेत. या वाहनांवर धूळ साचली आहे. वाहनांच्या आजूबाजूला स्वच्छता करता येत नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग साचू लागले होते. अशा वाहनांवर विभाग कार्यालयांच्या माध्यमातून नोटिसा चिकटविण्यात येत आहेत.     यानंतरही वाहन न हटविल्यास कारवाई केली जात आहे. सर्व भंगार वाहने उचलून डम्पिंग ग्राउंडवर ठेवण्यात येत आहेत. यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते स्वच्छ होऊ लागले आहेत. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी लावलेल्या अनधिकृत बॅनरविरोधातही कारवाई केली जात आहे. 

सर्व विभागांमध्ये अनधिकृत टपरी, रोडवरील अनधिकृत आइसक्रीमच्या गाड्या, बेवारस वाहनांविरोधात मोहीम सुरू केली आहे.  मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमणही हटविण्यास सुरुवात केली आहे. शहर स्वच्छतेला बाधा निर्माण करणारे व मोक्याच्या ठिकाणी जागा अडविणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. - राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई