शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

महापालिकेच्या ठेवी पाच महिन्यांत ४५० कोटींनी वाढल्या

By नारायण जाधव | Updated: September 12, 2023 19:30 IST

मेडिकल कॉलेज भूखंडासाठी ५६ कोटी सिडकोला दिले

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेने आपल्या खर्चांवर मर्यादा घातल्या असून अर्थसंकल्पातील तरतुदीच्या ७० टक्के मर्यादेपर्यंतच नवीन प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे ३१ मार्च २०२३ अखेर असलेल्या १३०० कोटींच्या मुदत ठेवींमध्ये ऑगस्टअखेरपर्यंत ४५० नी वाढ झाली असून, त्या आता १७५० कोटींवर गेल्या आहेत.

मागील आर्थिक वर्षात महानगरपालिकेने एमएमआरडीएचे १२६ कोटी रकमेचे कर्ज एकरकमी मुदतपूर्व फेडलेले असून, आता नवी मुंबई महानगरपालिका पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे.

एनएमएमटी होणार सक्षममहानगरपालिकेच्या परिवहन सेवेलाही स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून त्या दृष्टीने वाशी बस डेपोचा वाणिज्यिक विकास करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने १८३ कोटी इतका भरीव निधी परिवहन उपक्रमास उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आगामी काळात या वाणिज्य संकुलापासून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून एनएमएमटीचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होणार आहे.

मेडिकल कॉलेज भूखंडासाठी ५६ कोटी सिडकोला दिलेआरोग्य सेवा सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधेकरिता मोठा भूखंड सीबीडी बेलापूर येथे घेण्यात आलेला असून, त्यासाठी ५६ कोटी इतकी रक्कम सिडकोला दिलेली आहे.

निविदा समितीची पुनर्रचनायाशिवाय प्रशासनावर होणारी टीका, लोकप्रतिनिधींकडून येणारा दबाव यांना झुगारून आयुक्तांनी निविदा समितीची पुनर्रचना करून तिचे कामकाज, दायित्वाबाबत घ्यावयाची काळजी, एकंदरीत आर्थिक शिस्त राखून महानगरपालिकेचे वित्तीय मानांकन नेहमी चांगले राहील, या अनुषंगाने सक्त सूचना लेखा विभागासह अभियांत्रिकी, आरोग्य, घनकचरा विभागाला दिल्या आहेत.

लिडारमुळे ३०० कोटींची होणार वाढनवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत असून उत्पन्नवाढीकडे विशेष लक्ष दिले आहे. यानुसार नवनवे स्रोत शोधण्यासोबतच अद्याप मालमत्ता कराच्या कक्षेत नसलेल्या व मालमत्ता आकारमानात वाढ झालेल्या मालमत्तांना आपल्या कराच्या कक्षेत आणण्यासाठी अत्याधुनिक लिडार तंत्रज्ञानाद्वारे मालमत्ता सर्वेक्षण केले जात आहे. याचा फार मोठा फायदा होणार असून याद्वारे  वार्षिक    साधारणतः ३०० कोटी इतक्या रकमेची भर महानगरपालिकेच्या तिजोरीत पडणार आहे. याशिवाय जीएसटी व इतर बाबींद्वारे शासनामार्फत प्राप्त होणारे अनुदान मिळणार असल्याने प्रशासनाचा विश्वास दुणावला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई