शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

मृतदेह अदलाबदली प्रकरण अधिकाऱ्यांना भोवणार; आयुक्तांनी बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 7:24 PM

चौकशी समितीच्या अहवालातून हलगर्जीपणा उघड

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - रुग्णालयातून मृतदेहाची अदलाबदल होऊन मुस्लिम तरुणावर हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार झाल्याचे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांना भोवणार आहे. या घटनेला वाचा फोडल्यानंतर पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये घटनेला कारणीभूत बाबींचा उलगडा झाल्याने संबंधितांवर कारवाईचे संकेत देत आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

वाशी येथील पालिका रुग्णालयाच्या शवागारातून हा प्रकार घडला होता. त्याठिकाणी दिघा येथील काजल सूर्यवंशी व उलवे येथील उमर शेख यांचे मृतदेह ठेवण्यात आले होते. दोघांचाही मृत्यू कोरोनासदृश्य आजाराने झाल्याने चाचणीसाठी मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु 15 मे रोजी दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना कळवले होते. त्यानुसार मयत कालजला मृतदेह तिच्या वडिलांनी ताब्यात घेऊन त्याच दिवशी अंत्यविधी केला होता. मात्र चार दिवसांनी उमर शेखचे नातेवाईक त्याचा मृतदेह घेण्यासाठी आले असता मृतदेह आढळून आला नाही. अखेर दोन दिवसांनी मृतदेहाची अदलाबदल होऊन काजलच्या ऐवजी उमरचा मृतदेह देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.

रुग्णालयातील हलगर्जीमुळे मुस्लिम तरुणावर हिंदू पद्धतीने अंतिमसंस्कार झाल्याचा हा प्रकार  लोकमतने उघडकीस आणला होता. त्यानुसार मयत उमरच्या नातेवाईकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली असता, पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. त्यांनी घटनेशी संबंधित सर्वांची चौकशी केली असता अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रुग्णालयातील तिघा अधिकाऱ्यांना  कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली असून उत्तर समाधानकारक नसल्यास कारवाईचा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे संबंधितांना निष्काळजीपणा चांगलाच भोवणार आहे.

रुग्णालयाच्या शवागारात पालिका हद्दीबाहेरील मृतदेह न ठेवण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत. त्यानंतरही उलवेचा राहणार उमर शेख याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. तर शवागारात जागा अपुरी असल्याने काजल व उमर यांचे मृतदेह एकाच रॅक मध्ये ठेवले. त्यावेळी काजलच्या मृतदेहाची ओळख पटेल अशी माहिती असणारा लेबल देखील आढळला नाही. त्यामुळेच मृतदेहाची अदलाबदल होऊन गंभीर घटना घडल्याचा ठपका पालिका आयुक्तांनी लावला आहे. यामुळे शवागार प्रशासन व दोन डॉक्टरांना त्यांनी शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या घटनेप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. तशी मागणी मयत उमरच्या नातेवाईकांनी लावून धरली होती. त्यामुळे संबंधितांनी पालिका आयुक्तांना दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास त्यांना प्रशासकीय कारवाईसह पोलिसांच्या देखील कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

व्हिडीओ ठरला महत्वाचामृतदेह गहाळ झाल्यानंतर शोधाशोध सुरु असतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. काजल व उमर यांचे मृतदेह शवागारात एकाच पेटिट ठेवत असताना संबंधिताने माहितीस्तव हा व्हिडीओ काढला होता. तो व्हिडीओ समोर आल्यानंतर शवागारात निष्काळजीपणाचा अनेक बाबी समोर आल्या. तसेच शवागारात 18 पेट्या असताना त्याठिकाणी 32 मृतदेह ठेवले असल्याचीही बाब समोर आली.