शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

पालिकेचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 2:04 AM

प्रकल्प उभारण्यात अपयश : जुन्याच योजनांचा अंदाजपत्रकात समावेश

नामदेव मोरे 

नवी मुंबई : महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जुन्याच योजनांचा समावेश करण्यात आला आहे. गतवर्षीच्या महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात अपयश आले आहे. वर्षानुवर्षे अर्थसंकल्पात नावापुरत्याच महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश केला जात असून त्या नक्की कधी पूर्ण केल्या जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०२०-२१ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पामध्ये अपवाद वगळता सर्व जुन्याच योजनांचा समावेश करण्यात आला आहे. योजना त्याच फक्त त्यावरील खर्चाच्या आकड्यांमध्ये बदल करण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये गवळी देव परिसरामध्ये निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करणे, मोरबे धरण परिसरामध्ये पीपीपी योजनेअंतर्गत पर्यटनस्थळ विकसित करणे. धरण परिसरामध्ये व डम्पिंग ग्राउंडवर वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्याच्या योजनेचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला होता. परंतु या योजना अद्याप प्रत्यक्षात येऊ शकलेल्या नाहीत. नेरूळमध्ये सायन्स पार्कची उभारणी करणे. जुुईनगरमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधणे, महापालिकेने नेरूळ, वाशी व ठाणे-बेलापूर रोडवर पादचारी पूल बांधणे. वाशी, ऐरोली व महापेमध्ये भुयारी मार्ग बांधणेही अर्थसंकल्पात प्रस्तावित केले होते. परंतु ते प्रकल्पही प्रत्यक्षात येऊ शकलेले नाहीत. नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये सायन्स पार्क उभारणे प्रस्तावित आहे. यासाठी अनेक वर्षांपासून तरतूद करण्यात येत आहे. गतवर्षी त्यासाठी निविदा प्रक्रिया, सल्लागार नियुक्तीही करण्यात आली होती. पण अद्याप तो प्रकल्प सुरू झालेला नाही. महापुरुषांच्या नावाने भवन बनविण्याची योजनाही दहा वर्षांपासून प्रलंबित आहे.

महापालिका प्रत्येक वर्षी आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद करत असते. महापालिकेने यापूर्वी बांधलेल्या ऐरोली, नेरूळ व बेलापूर रुग्णालय पूर्णक्षमतेने सुरू करण्याची घोषणा केली होती. पण ही रुग्णालये सुरू करणे शक्य झालेले नाही. आरोग्य विभागामध्ये डॉक्टर व इतर कुशल कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. कर्मचारी कमी असल्यामुळे शहरवासीयांना आवश्यक त्या सुविधा देता येत नाहीत. प्रत्येक अर्थसंकल्पातील चर्चेच्या वेळी आरोग्याच्या विषयावरून नगरसेवक प्रशासनास धारेवर धरतात. पण प्रत्यक्षात आश्वासनांशिवाय काहीही होत नाही. क्रीडा विभागासाठी महापालिकेने यापूर्वी केलेल्या घोषणाही हवेत विरल्या आहेत. वाशीमध्ये आॅलिम्पिक दर्जाचा तरण तलाव उभारण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून अर्थसंकल्पात त्याविषयी तरतूद करण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात तरण तलावाचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. घणसोलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणाच्या कामाचीही फक्त घोषणा होत असून प्रत्यक्षात काम सुरू होत नाही. पुढील वर्षभरात ही कामे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मालमत्ता कर घोटाळ्याविषयी संभ्रम कायमनवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामध्ये घोटाळा झाल्याचा मुद्दा तीन वर्षांपूर्वी राज्यभर गाजला होता. तत्कालीन आयुक्तांनीही अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये मालमत्ता कर विभागातील अनागोंदी कारभारामुळे जवळपास एक हजार कोटींच्या दरम्यान पालिकेचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आणून दिले होते. या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. जवळपास ५०० कोटींच्या नुकसानीविषयी गुन्हाही दाखल झाला होता. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना याविषयी पत्रकार परिषदेमध्ये माहिती विचारली असता या प्रकरणी लाचलुचपत विभागाने जी माहिती मागितली होती ती त्यांना देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. परंतु प्रत्यक्षात घोटाळा झाला की नाही याविषयी संभ्रम मात्र अद्याप कायम आहे.वर्षभरामध्ये पूर्ण न झालेल्या योजनाच्घणसोली ते ऐरोली दरम्यान उड्डाणपूल बांधणेच्दिवाळे येथे कोल्डस्टोरेजसह मासळी मार्केट उभारणेच्मौलाना आझाद, मदर तेरेसा, सेवालाल व महात्मा बसवेश्वर भवन उभारणेच्विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये नाट्यगृह उभारणेच्श्वान नियंत्रण केंद्राची व पशुवैद्यकीय रुग्णालयाची उभारणीच्पाळीव श्वान उद्यान व पक्षी-प्राणिसंग्रहालय उभारणेच्डेब्रीज प्रक्रिया, कचºयापासून खत व वीजनिर्मिती केंद्र उभारणेच्तरण तलाव, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल व इनडोअर स्टेडियम उभारणेच्मोरबे धरण परिसरामध्ये थीम पार्क, सोलर प्रकल्प व विद्युत प्रकल्प उभारणेच्नेरूळ, वाशी व ठाणे-बेलापूर रोडवर पादचारी पूल बांधणेच्वाशी, ऐरोली व महापेमध्ये भुयारी मार्ग बांधणेच्गवळी देव पर्यटनस्थळ विकसित करणेच्जुईनगरमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधणेच्ऐरोली, नेरूळ व सीबीडी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात अपयशवर्षभर केलेली कामे पुढीलप्रमाणेच्शहाबाज येथील जुने कर्मचारी निवासस्थान तोडून नवीन बांधण्याचे काम सुरूच्नेरूळ सेक्टर १९ मध्ये स्केट पार्कचे काम करण्यात आले आहेच्ज्वेल आॅफ नवी मुंबई येथे स्मृतिवन विकसित करण्याचे काम पूर्णत्वासच्शहरातील मूळ गावांच्या बाहेर प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरूच्विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या अंतर्गत सजावटीचे काम पूर्णच्यादवनगरमध्ये २२०० विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेसाठी नवीन इमारतीचे बांधकाम सुरूच्राजर्षी शाहू महाराज विद्यालय, आंबेडकरनगर रबाळे येथे ५० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.च्एमआयडीसी परिसराला मोरबेच्या जलवाहिनीवरून पाणी उपलब्ध करून देण्याचे काम अंतिम टप्प्यातच्दिवाबत्ती कामाअंतर्गत शहरातील उर्वरित ठिकाणी १५५७ नवीन दिवाबत्तीचे खांब लावण्यात आले आहेत.