महापालिका आक्रमक; होर्डिंग वाचविण्यासाठी जाहिरातदारांची पळापळ

By नामदेव मोरे | Published: May 16, 2024 07:49 PM2024-05-16T19:49:21+5:302024-05-16T19:50:22+5:30

घाटकोपर येथे १३ मे रोजी झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १४ मे रोजी दूरदृष्य प्रणालीद्वारे तत्काळ महानगरपालिका अधिकारी यांची बैठक घेतली.

Municipal aggressive; Advertisers rush to save Hoardings | महापालिका आक्रमक; होर्डिंग वाचविण्यासाठी जाहिरातदारांची पळापळ

महापालिका आक्रमक; होर्डिंग वाचविण्यासाठी जाहिरातदारांची पळापळ

नवी मुंबई : मुंबईमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महानगरपालिकाही आक्रमक झाली आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंगविरोधात मोहीम सुरू केली आहे. बुधवारी एका दिवसामध्ये १५ होर्डिंग हटविले असून गुरुवारी पहाटे पाच वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती.

घाटकोपर येथे १३ मे रोजी झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १४ मे रोजी दूरदृष्य प्रणालीद्वारे तत्काळ महानगरपालिका अधिकारी यांची बैठक घेतली. शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षण करून स्ट्रक्चरल ऑडिट तत्काळ सादर करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले होते. ते न करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, ज्यांनी परवान्यांचे नूतनीकरण केले नाही त्यांच्यावरही कारवाईचे आदेश दिले होते. सर्व विभाग अधिकाऱ्यांना तत्काळ सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या आहेत. १५ मे ला सायंकाळी ५ वाजल्यापासून अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई सुरू केली. गुरुवारी पहाटे पाचपर्यंत १२ तासामध्ये १५ होर्डिंग हटविण्यात आले. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू केली आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील एमआयडीसी, रेल्वे, सिडको व इतर अस्थापनांच्या जागेत असलेल्या होर्डिंगचे सर्वेक्षण केले जात आहे. परवानगी घेतलेल्या आकारापेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग लावले असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. विभाग कार्यालयाकडून येणाऱ्या अहवालाप्रमाणे तत्काळ अनधिकृत होर्डिंग हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे-बेलापूर रोडवर कारवाई
गुरुवारीही होर्डिंगविरोधातील मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. ठाणे-बेलापूर रोडवरील कोपरखैरणे विभागात मोहीम सुरू केली आहे. यापुढे सर्व अनधिकृत होर्डिंग हटविले जात नाहीत तो पर्यंत मोहीम सुरू ठेवली जाणार आहे.

होर्डिंगविरोधातील कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे

बेलापूर रेल्वे स्टेशन, अग्निशमन केंद्राच्या जवळ अशा दोन होर्डिेगवर कारवाई केली.

शिरवणे सेक्टर १ मधील प्लॉट क्रमांक ४३ वरील ३ होर्डिंग हटविले.

वाशी गावातील कृष्णा रेस्टॉरंटजवळील दोन अनधिकृत होर्डिंग तोडले.

सानपाडा स्टेशनच्या पूर्व भागातील ४ अनधिकृत होर्डिंग हटविली.

घणसोली गवळीदेव जवळील दिशादर्शक कमानीची लोखंडी फ्रेम हटविली.

ऐराेली सेक्टर ३ बसडेपो जवळील १, दिघा येथील हॉटेल मुंबई एक्सप्रेसजवळील २ होर्डिंग हटविले.
 

Web Title: Municipal aggressive; Advertisers rush to save Hoardings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.