शिरवणेतील दुर्गोत्सवात विविधरंगी कार्यक्रम
By Admin | Updated: October 4, 2016 02:52 IST2016-10-04T02:52:30+5:302016-10-04T02:52:30+5:30
नवरात्रौत्सवात सार्वजनिक मंडळांकडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा तसेच महिलांसाठीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

शिरवणेतील दुर्गोत्सवात विविधरंगी कार्यक्रम
नवी मुंबई : नवरात्रौत्सवात सार्वजनिक मंडळांकडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा तसेच महिलांसाठीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. लोकमत माध्यम प्रायोजक आणि सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, शिरवणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे यंदाचे हे ३० वे वर्ष असून देवीची उपासना, धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी महालक्ष्मी प्रासादिक महिला भजन मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बुधवारी ५ आॅक्टोबर, संध्याकाळी मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच गावदेवी प्रासादिक भजन मंडळ दारावे यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. गुरुवारी ६ आॅक्टोबर रोजी गोठीवलीत ओमकार प्रासादिक भजन मंडळाकडून तर शुक्रवारी ७ आॅगस्टला कुकशेतच्या विठ्ठल प्रासादिक भजन मंडळाचा कार्यक्रम आहे. शनिवारी संध्याकाळी मराठमोळ्या संगीत नृत्याचा आविष्कार कार्यक्रम असून त्यानंतर हळदी-कुंकू समारंभ होणार आहे. रविवारी करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जाणार असून संध्याकाळी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री गणेश नाईक , महापौर सुधाकर सोनावणे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक,माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून संस्कृतीचा वारसा, परंपरा तसेच धार्मिकता जपण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जयवंत सुतार यांनी दिली. मंडळाचे अध्यक्ष विनायक भोईर, उपाध्यक्ष धनंजय थोरात, सचिव संदीप पाटील, खजिनदार रोशन प्रभाकर किरवडकर, प्रमुख सल्लागार माधुरी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे.