शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; आयोगाच्या सचिव डॉ. खरात यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:55 IST

राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सहा विभागांतील एकूण ८६९ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. राज्यभरातून २ लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पारदर्शकपणे घेतल्या जाणार आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २ फेब्रुवारीला या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले आहे.

या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे उमेदवारांत गोंधळाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर खरात यांनी गुरुवारी परिषद घेऊन याबाबतचा खुलासा केला. प्रश्नपत्रिका बंदोबस्तात सुरक्षित ठेवल्या आहेत. काहींनी उमेदवारांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले. त्या बदल्यात त्यांच्याकडून ४० ते ४५ लाख रुपयांची मागणी केल्याच्या तक्रारी आहेत. यात कोणतेही तथ्य नसून प्रश्नपत्रिका सुरक्षित आहेत, असे त्यांनी सांगितले. 

२ लाख ८६ हजार  विद्यार्थी देणार परीक्षामहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी  यंत्रणा सज्ज आहेत. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सहा विभागांतील एकूण ८६९ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. राज्यभरातून २ लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. त्यादृष्टीने परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे पोलिसांत तक्रारया प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपासही सुरू केला आहे. त्यामुळे उमेदवारांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेच्या तयारीला लागावे, असे आवाहनही खरात यांनी केले आहे. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी