टेंबा रुग्णालयासाठी हालचाली

By Admin | Updated: May 28, 2014 01:40 IST2014-05-28T01:40:39+5:302014-05-28T01:40:39+5:30

पालिकेचे सर्वसाधारण टेंबा रुग्णालय मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रान्वये २०१८ मध्ये पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Movement for the Temba Hospital | टेंबा रुग्णालयासाठी हालचाली

टेंबा रुग्णालयासाठी हालचाली

राजू काळे, भार्इंदर - सुरु करण्याच्या प्रक्रियेत अडकलेले पालिकेचे सर्वसाधारण टेंबा रुग्णालय मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रान्वये २०१८ मध्ये पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु, हे रुग्णालय वैद्यकीय नियमावलीनुसार सुरु करण्याचा प्रश्न प्रशासनापुढे असून त्यासाठी वैद्यकीय सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव प्रशासन स्थायी व महासभेत सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाने २००९ मध्ये २०० खाटांचे टेंबा सर्वसाधारण रुग्णालय सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केली. ४ मजली सर्वसाधारण रुग्णालयाची जबाबदारी आर्थिकदृष्ट्या पेलवणारी नसल्याने प्रशासनाने २०१२ मध्ये हे रुग्णालय राज्य शासनाने अथवा धर्मदाय/सेवाभावी संस्थेने सुरु करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे आणला होता. त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पालिकेने त्याच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात दिवाणी अर्ज सादर केला होता. त्यावर मार्च २०१४ मध्ये झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पालिकेचा दिवाणी अर्ज फेटाळून हे रुग्णालय पालिकेनेच सुरु करावे असा आदेश दिला. तत्पूर्वी हे रुग्णालय पालिका कशाप्रकारे सुरु करणार, त्याचे प्रतिज्ञापत्रच सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पालिकेला दिले. त्यानुसार पालिकेने २८ मार्च २०१४ रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात मार्च २०१५ पर्यंत रुग्णालयात बा' रुग्ण विभागासह रुग्णांचे चाचणी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे पालिकेने नमूद केले आहे. पुढे २०१८ पर्यंत पालिकेच्या आर्थिक कुवतीनुसार हळूहळू रुग्णालयातील खाटांची संख्या वाढून ते २०० खाटांपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे म्हटले आहे. परंतु, या रुग्णालयातील वैद्यकीय सेवा व त्यातील विविध विभाग वैद्यकीय नियमावलीनुसार कसे सुरु करावे, असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासांठी वैद्यकीय सल्लागाराची नियुक्ती करण्याचे ठरवले आहे.

Web Title: Movement for the Temba Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.