शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या वकिलीच्या पदवी परीक्षेचे अखेर मुलीनेच फोडले बिंग, ऑनलाइन परीक्षेतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 11:19 IST

कोरोनामुळे ऑनलाईन झालेल्या एलएलबीच्या परीक्षेत दुसऱ्यामार्फत परीक्षा देऊन पास झालेल्या आईविरोधात मुलीने तक्रार दिली आहे. मुंबईच्या एका पोलीस निरीक्षकाच्या मदतीने हा प्रकार घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

नवी मुंबई : कोरोनामुळे ऑनलाईन झालेल्या एलएलबीच्या परीक्षेत दुसऱ्यामार्फत परीक्षा देऊन पास झालेल्या आईविरोधात मुलीने तक्रार दिली आहे. मुंबईच्या एका पोलीस निरीक्षकाच्या मदतीने हा प्रकार घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्याद्वारे नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबईत राहणाऱ्या व व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मुलीने तिच्या आईविरोधात ही तक्रार केली आहे. आईचे मुंबईतील एका पोलीस निरीक्षकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याने मुलगी ती वडिलांसोबत राहायला आहे. दरम्यान २०२० मध्ये तिच्या आईने लॉकडाऊन कालावधीत ऑनलाईन झालेल्या एलएलबीच्या परीक्षेत स्वतःची परीक्षा देण्यासाठी पोलीस निरीक्षकाच्या मदतीने उलवे येथील एका वकिलाचा वापर केला होता. काही पेपर उलवे येथे तर काही पेपर नेरुळमध्ये बसून मोबाईलवर देण्यात आले होते. 

यासाठी संबंधित वकिलाने मोबाईलचा कॅमेरा बंद करून स्वतः पेपर सोडवून तक्रारदार यांच्या आईला उत्तम गुणांनी पास होण्यास मदत केली होती. मात्र हा प्रकार तक्रारदार यांना खटकत राहिल्याने अखेर त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

पोलिस असलेल्या प्रियकराच्या मदतीने....डमी उमेदवारांमार्फत परीक्षा देऊन वकील बनलेल्या महिलेसह तिचा पेपर देणाऱ्या वकील व मुंबईच्या एका पोलीस निरीक्षकावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनदा परीक्षा देऊनही उत्तीर्ण न होऊ शकलेल्या महिलेने, अखेर पोलीस प्रियकराच्या मदतीने एलएलबी पास होण्यासाठी ही शक्कल लढवल्याचे मुलीच्या तक्रारीवरून समोर आले आहे.

टॅग्स :examपरीक्षाCrime Newsगुन्हेगारी