मुलानेच चोरी केल्याचा आईला संशय
By Admin | Updated: May 15, 2014 00:52 IST2014-05-15T00:52:27+5:302014-05-15T00:52:27+5:30
एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडी-सोनसाखळी आणि वाहनचोरी अशाप्रकारचे सहा गुन्हे नोंद झाले आहे.

मुलानेच चोरी केल्याचा आईला संशय
ठाणे : एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडी-सोनसाखळी आणि वाहनचोरी अशाप्रकारचे सहा गुन्हे नोंद झाले आहे. कळव्यातील खुर्शीदा सिद्दीकी यांचे घर बनावट चावीने उघडून घरातील १ लाख ८८ हजारांचे ९ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. यात त्यांनी त्यांचा लहान मुलगा नदीमने चोरी केल्याचा संशय व्यक्त केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. दुसर्या घटनेत, वीर सावरकर मार्गावरील विश्वजीत सोसायटीतील विलास टिपनीस यांची पत्नी व मुलगा कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी घर फोडून घरातील ३३ हजार ३०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. तिसर्या घटनेत, कळव्यातील अरुणा गोळे या ट्रव्हल्स बसने पोलादपूर ते कळवा असा प्रवास करताना बसच्या डिक्कीत ठेवलेल्या बॅगेतून ५० हजारांचे दोन तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी कळवा ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पाचव्या घटनेत, मुरबाडमधील वैशाली मोरे या ठाण्यात आल्या असताना त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरीला गेल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. तसेच सहाव्या घटनेत, कौसा-मुंब्रा रफीक शेख यांनी उभी केलेली रिक्षा चोरीला गेल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.अनेक गस्ती पथके तयार करुन पोलिस या चोर्या रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, तरी चोर्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. (प्रतिनिधी)