शहरं
Join us  
Trending Stories
1
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
2
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
3
‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  
4
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
5
"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
6
अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार?
7
महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
8
"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
9
मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का! उमेदवार आझम काझींसह ८ जण कोल्हापूर-सांगलीतून हद्दपार
10
मुस्लिम मतांची गरज नाही, त्यांच्या घरीही जात नाही; भाजपा आमदाराच्या विधानानं वाद, Video व्हायरल
11
चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती
12
"अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला", हर्षवर्धन सपकाळ यांची टीका   
13
मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."
14
Makar Sankrant 2026: यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग; खिचडी नाही, तर करा 'या' वस्तूंचे दान
15
बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या
16
एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
17
"कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत"; बाळासाहेबांचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बरंच सुनावलं
18
Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर अडचणीत सापडण्याची शक्यता, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमके प्रकरण काय?
19
तेलाचा टँकर जप्त केल्याने तणाव वाढला, जर युद्ध झालं तरं रशियाची ही शस्त्रे अमेरिकेला पडतील भारी
20
ट्रम्प टॅरिफचा फटका! या भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं नुकसान; ५० टक्यांनी घसरला भाव
Daily Top 2Weekly Top 5

जुहूगाव, रबाळे, सानपाडा, वाशी, घणसोलीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 01:54 IST

८ ठिकाणी दुपटीपेक्षा जास्त वाढ : इंदिरानगर, इलठाणपाडामध्ये कमी रुग्ण

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. जुहूगाव, रबाळे, सानपाडा, घणसोली व वाशीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. जवळपास ८ नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात एक महिन्यात रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. प्रत्येक नोडमध्ये रुग्ण वाढत असून प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान महानगरपालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे.           नवी मुंबईमध्ये ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णांचा आलेख प्रतिदिन वाढू लागला आहे. कोरोना नियंत्रणाच्या अभियानामध्ये आतापर्यंत नागरी आरोग्य केंद्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २३ केंद्रांच्या माध्यमातून परिसरात जनजागृती करण्यापासून सर्व उपक्रम प्रत्येक घरात पोहोचविण्याचे काम केले जात आहे. रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याचे कामही आरोग्य केंद्रातील कर्मचारी करत आहेत. यापूर्वी इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर कोराेनामुक्त झाला होता. परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आलेल्या लाटेमुळे या विभागांमध्येही रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. एक महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या ७६२ वरून १४३० वर पोहोचली आहे. ८ विभागांत सक्रिय रुग्णांच्या प्रमाणात दुप्पट वाढ झाली आहे. सद्य:स्थितीमध्ये जुहूगावमध्ये सर्वाधिक १३७ सक्रिय रुग्ण आहेत. रबाळेमध्ये १३२, सानपाडामध्ये १२६, घणसोलीत ११५ व वाशीगाव नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात १०३ रुग्ण आहेत. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पुन्हा नागरी आरोग्य केंद्राच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप सक्रिय करण्यास सांगितले आहे. रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या आरोग्यावरही लक्ष ठेवले जात आहे. कोरोनाविषयी नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई केली जात आहे. नियम तोडणाऱ्या हॉटेल चालकांवरही गुन्हे दाखल केले जात आहेत. नागरिकांनीही नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. 

इलठाणपाडात संख्या झाली कमीइलठाणपाडा व कुकशेत नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात एक महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ५ फेब्रुवारीला कुकशेतमध्ये ४३ सक्रिय रुग्ण होते ते कमी होऊन ४० झाले आहेत. इलठाणपाडामध्ये ही संख्या १० वरून पाचवर आली आहे. याच पद्धतीने इतर विभागांतही रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या