शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना थैमान घालणार?, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
4
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
5
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
6
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
7
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
8
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
9
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
10
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
11
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
12
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
13
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
14
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
16
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर
17
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
18
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
19
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
20
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

रिक्षानाक्यावर चालकांची मक्तेदारी

By admin | Updated: July 3, 2017 06:44 IST

पनवेल परिसरात अनेक रिक्षाचालक-मालक संघटना कार्यरत आहेत. या संघटनांकडून एका नाक्यावरील चालकांना दुसऱ्या ठिकाणी

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल परिसरात अनेक रिक्षाचालक-मालक संघटना कार्यरत आहेत. या संघटनांकडून एका नाक्यावरील चालकांना दुसऱ्या ठिकाणी व्यवसाय करू दिला जात नाही. संबंधित रिक्षाचालकांच्या संघटनांची अरेरावी व मक्तेदारी दिवसेंदिवस वाढतच आहे. अन्यत्र ठिकाणाहून एखादा रिक्षाचालक आल्यास त्याला प्रवासी भाडे भरण्यास नकार दिला जातो, शिवाय शिवीगाळ करून मारहाण करण्याचे प्रकारही घडले आहेत. दररोज वादविवाद सुरू असल्याने त्यांचा त्रास प्रवाशांनाही होत आहे. याबाबत संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर त्याचबरोबर इतर ठिकाणी अंतर्गत प्रवाशांकरिता प्रवासी तीनआसनी रिक्षांना प्राधान्य देतात. एनएमएमटीचे जाळे पसरविण्याचे काम सुरू असले तरी मागणीप्रमाणे बसच्या फेऱ्या अपुऱ्या आहेत. त्याचबरोबर अनेक मार्गावर अद्याप बससेवा सुरू झाली नसल्याने रिक्षा हा एकमेव पर्याय आहे. पनवेल परिसरात आजही मीटरप्रमाणे रिक्षा चालत नाहीत. याकरिता अनेक प्रयत्न झाले; परंतु रिक्षाचालकांनी मीटर डाउन केलेच नाही. याशिवाय नियमानुसार कोणताही रिक्षाचालक कुठेही व्यवसाय करू शकतो; परंतु पनवेलसह सिडको वसाहतीतील रिक्षाचालक तसा व्यवसाय करीत नाहीत. एका वसाहतीतील रिक्षावाला दुसरीकडे भाडे घेऊन गेला तर त्याला त्या ठिकाणी रिक्षा उभी करून प्रवासी घेऊ दिले जात नाहीत. यामुळे त्याला मोकळीच रिक्षा घेऊन परत यावे लागते. त्याचा काही प्रमाणात भार प्रवाशांवर पडतो. याशिवाय प्रत्येक वसाहतीत रिक्षानाक्यावर दुसऱ्या रिक्षाचालकाला उभे राहून दिले जात नाही. कळंबोली वसाहतीत हीच परिस्थिती आहे. जर एखाद्या रिक्षाचालकाने प्रवाशांना बसवले तर त्याला मारहाण केली जाते. मंगळवारी शिवसेना शाखेजवळील नाक्यावर अशीच घटना घडली. असे प्रकार वारंवार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी खांदा वसाहतीतील शिवाजी चौकात दुसऱ्या रिक्षाचालकाने प्रवाशांना घेऊन जाण्यास मज्जाव केला नाही म्हणून एका स्थानिक रिक्षाचालकांनी त्याच नाक्यावरील दोन रिक्षाचालकांना मारहाण केली. अशा तक्रारी दररोज स्थानिक पोलीस ठाण्यात येतात. मात्र, त्यावर कारवाई होताना दिसत नाही.रिक्षावाल्यांची मुजोरी मोडीत काढा शेकापच्या जिल्हा चिटणीस मंडळाच्या महिला सदस्या वंदना तानजी बामणे यांनी याबाबत पनवेल आरटीओला पत्र दिले आहे. रिक्षानाक्यावर इतर रिक्षाचालकांची नाकेबंदी करणाऱ्या संबंधित रिक्षाचालकांची मक्तेदारी, मुजोरी मोडीत काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई व कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी बामणे यांनी केली आहे.कोणताही रिक्षावाला कुठेही व्यवसाय करू शकतो. ठरावीक रिक्षावाल्यांनीच त्या ठिकाणी प्रवासी भरावे, असे काही नाही. तिथे इतरांना मज्जाव संबंधित रिक्षावाले करू शकत नाही, अशा तक्र ारी आल्या तर वाहतूक पोलिसांच्या मदतीने संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच रिक्षाचालकांबरोबर संवाद साधून त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला जाईल.- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल.