अनधिकृत पार्किंगमधून पैसे वसुली
By Admin | Updated: February 24, 2017 08:00 IST2017-02-24T08:00:48+5:302017-02-24T08:00:48+5:30
खारघरमध्ये वाहतूक व पार्किंगची समस्या गंभीर आहे. शहरात सर्वात जास्त वाहतूककोंडी

अनधिकृत पार्किंगमधून पैसे वसुली
पनवेल : खारघरमध्ये वाहतूक व पार्किंगची समस्या गंभीर आहे. शहरात सर्वात जास्त वाहतूककोंडी होत असलेल्या हिरानंदानी लिटल वर्ल्ड परिसरात वाहतूककोंडी फोडण्यासाठी सिडकोने उभारलेली पार्किंग सुरू करण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी सिडकोकडे केली होती. त्यानंतर याठिकाणी टेंडर काढून पे अॅण्ड पार्क सिडकोच्या वतीने सुरू करण्यात आले. मात्र, पे अॅण्ड पार्क सुरू करूनदेखील वाहतूककोंडीची समस्या सुटताना दिसत नाही. अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांकडून पार्किंग शुल्क वसूल करण्याचे काम संबंधित ठेकेदार करीत आहे.
महिनाभरापासून लिटल वर्ल्ड समोरील सुमारे ३००पेक्षा जास्त क्षमतेची पार्किंग व्यवस्था असलेल्या जागेवर पे अॅण्ड पार्क पार्किंग व्यवस्था सुरू झाली आहे. या ठिकाणी होणाऱ्या गाड्यांच्या अनधिकृत पार्किंगमुळे जवळच असलेल्या सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम होत होता. या परिसरात रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी कमी होण्याकरिता ही पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात खारघर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनीही सिडकोकडे पत्रव्यवहार करून लवकरात लवकर ही पार्किंग सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सिडकोने वि. सी. पाटील इंटरप्रायझेस या कंपनीला संबंधित पे अॅण्ड पार्कचा ठेका दिला. मात्र, नो पार्किंगमध्ये चारचाकी वाहनांना वाहन पार्क करण्याची परवानगी नसतानाही या पार्किंगच्या गेटसमोर चारचाकी वाहने पार्क केली जात आहेत. विशेष म्हणजे, त्या वाहनचालकांना यासंदर्भात समज न देता, संबंधित कंत्राटदाराकडून अनधिकृत पार्किंगचे पैसे वसूल केले जात आहेत. यासंदर्भात खारघर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठवून सिडकोच्या परिवहन विभागालाही या प्रकाराची माहिती देण्यासाठी पत्र पाठविले आहे. मात्र, परिस्थिती जैसे थेच असून या ठिकाणची वाहतूककोंडी वाढत चालली आहे.
यासंदर्भात वि. सी. पाटील इंटरप्रायझेस या पे अॅण्ड पार्क शुल्क वसूल करणाऱ्या कंपनीचे ठेकेदार सुनील चौबे यांना या प्रकाराबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘आम्हाला वाहतूक पोलिसांनी जागा मोकळी करून दिल्यास आम्ही त्याठिकाणाहून पार्किंग शुल्क वसूल करणार नाही. आम्ही घेतलेल्या पार्किंगच्या ठेक्यात या ठिकाणी दुचाकी पार्किंगकडून शुल्क वसूल करण्याचा आम्हाला अधिकार आहे. विशेष म्हणजे, अनधिकृत पार्किंगचे पैसे वसूल करण्याच्या निर्णयाला
ठेकेदाराने समर्थन केल्याचेच दिसून येत आहे.