व्हॅनचालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 01:39 IST2016-01-16T01:39:20+5:302016-01-16T01:39:20+5:30

स्कूल व्हॅनचालकाने सातवीत शिकणाऱ्या एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजी शेख (३०) हा स्कूल व्हॅनचालक सेंट जोसेफ

Molestation of the woman from the van | व्हॅनचालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

व्हॅनचालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

कळंबोली : स्कूल व्हॅनचालकाने सातवीत शिकणाऱ्या एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजी शेख (३०) हा स्कूल व्हॅनचालक सेंट जोसेफ हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची ने-आण करतो. शुक्रवारी दुपारी सातवीत शिकणाऱ्या मुलीला शाळेत घेऊन जाताना शेख याने तिचा विनयभंग केला. तिने झालेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पालकवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत असून, संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Web Title: Molestation of the woman from the van