रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:06 IST2019-05-27T00:06:22+5:302019-05-27T00:06:24+5:30

परिचयाचा फायदा घेत महिलेच्या घरात घुसून रिक्षाचालकाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

Molestation of woman by rickshaw driver | रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

नवी मुंबई : परिचयाचा फायदा घेत महिलेच्या घरात घुसून रिक्षाचालकाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करून रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे.
सुधाकर चिकणे (३५) असे रिक्षाचालकाचे नाव असून, तो दिघा येथील रामनगरचा राहणारा आहे. त्याच परिसरात राहणाऱ्या महिला त्याच्या ओळखीची होती. या ओळखीचा फायदा घेत त्याने घरात घुसून बळजबरी केल्याची तक्रार महिलेने त्याच्याविरोधात केली आहे.
चिकणे याने दुपारच्या सुमारास महिला घरात एकटी असल्याची संधी साधून आत प्रवेश केला. त्यानंतर महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला असता, तिने स्वत:ची सुटका करून घेतली. या प्रकारानंतर सदर महिलेने रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली असता, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Molestation of woman by rickshaw driver