मोबाइल चोरला म्हणून केली त्याची निर्घृण हत्या

By Admin | Updated: July 18, 2015 23:21 IST2015-07-18T23:21:52+5:302015-07-18T23:21:52+5:30

तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे सूत्रकारलगतच्या जंगलात २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा निर्घृण हत्या केलेला मृतदेह आढळून आला. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला

As a mobile chorla, he killed his innocent slayer | मोबाइल चोरला म्हणून केली त्याची निर्घृण हत्या

मोबाइल चोरला म्हणून केली त्याची निर्घृण हत्या

तलासरी : तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे सूत्रकारलगतच्या जंगलात २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा निर्घृण हत्या केलेला मृतदेह आढळून आला. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच तलासरी पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याचा छडा लावून मृतदेहाची ओळख पटवून दोन आरोपींना गजाआड केले तर उर्वरित दोन फरारी आरोपींचा तपास पोलीस करीत आहेत.
केंद्रशासित प्रदेशातील वेळगाव येथील कारखान्यात काम करणाऱ्या सुनील विजयेंद्र खैरपाल या तरुणाची निर्घृण हत्या केलेला मृतदेह सूत्रकारमध्ये आढळून आला. प्रथम अनोळखी इसम म्हणून दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास तलासरी पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक घनश्याम आढाव व पोलीस उपनिरीक्षक मुल्ला यांनी तत्काळ करून मृतदेहाची ओळख पटविली व अधिक तपासाकरिता सुनील यांच्या कारखान्यातीलच मोहम्मद जाहीर मोहम्मद मुसाफिर अन्सारी, रा. सुरंगी यांच्याशी मोबाइलचोरीवरून वाद झाल्याचे कळले.
सुनील खैरपाल याने आपला मोबाइल चोरला, या रागातून मोहम्मद जाहीर तसेच अरुण सुकऱ्या पवार यांनी इतर दोघांच्या मदतीने सुनील यास मारहाण करून मोटारसायकलवर बसवून सूत्रकारमधील जंगलात आणून तीक्ष्ण हत्याराने तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. याबाबत, मोहम्मद जाहीर मोहम्मद मुसाफिर अन्सारी व अरुण सुकऱ्या पवार यांना अटक केली असून अजून दोन फरारी आरोपींचा तपास तलासरी पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: As a mobile chorla, he killed his innocent slayer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.