शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sharmila Thackeray : "...तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत"; शर्मिला ठाकरेंनी महिलांवरील अत्याचारावर व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 12:50 IST

Sharmila Thackeray And Yashshree Shinde : नवी मुंबईतील घटना आणि महिलांवरील अत्याचारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे य़ांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला ठाकरे य़ांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. 

उरण येथील यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली आहे. आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून ताब्यात घेतलं. नवी मुंबईतील घटना आणि महिलांवरील अत्याचारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे य़ांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला ठाकरे य़ांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. 

"शक्ती कायदा पास करावा अशी पंतप्रधानांना विनंती आहे. असे गुन्हे झाले की त्यांना फाशीच झाली पाहिजे" असं देखील शर्मिला ठाकरे य़ांनी म्हटलं आहे. "पोलिसांना या केसेसमध्ये कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही. तरी सुद्धा जर त्यांनी एक्शन घेतली नाही तर आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितली आहे. ही तुमची जबाबदारी असल्याचं सांगितलं. सर्व मुलींच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आहे. कोणताच पक्ष तुम्हाला अडवणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा."

"गेल्या तीन दिवसांत तीन मुली... किती हिंस्त्रपणा. निर्भया प्रकरणात १६ वर्षांचा मुलगा सुटला हे चूकच आहे. ज्या मुलांमध्ये विकृती आहे त्यांना फाशी द्या. या लोकांवर पोलिसांची दहशत असली पाहिजे. पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत. शक्ती कायदा पास करावा अशी पंतप्रधानांना विनंती आहे. असे गुन्हे झाले की त्यांना फाशीच झाली पाहिजे" असं माध्यमांना प्रतिक्रिया देताना शर्मिला ठाकरे य़ांनी म्हटलं आहे. 

उरण येथे राहणारी २० वर्षीय यशश्री शिंदे गुरुवारी बेपत्ता झाली होती. तिचा शोध पोलिसांकडून सुरू होताच त्यातच शुक्रवारी रात्री उशीरा एका पेट्रोल पंपाजवळील निर्जनस्थळी तरुणीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह यशश्रीचा असल्याचं निष्पन्न झालं. या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करणारे डॉक्टरही तिची अवस्था पाहून हादरले. यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टला मोठी जखम होती. शरीरावर अनेक वार केले होते. तिचा निर्घृण खून केल्याचं उघड झालं. 

टॅग्स :sharmila thackerayशर्मिला ठाकरेNavi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस