आर्थिक वादातून मित्राची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:16 IST2018-07-15T02:16:03+5:302018-07-15T02:16:05+5:30

हातातील पैसे खेचल्याच्या कारणावरून मद्यधुंद अवस्थेत एकाने मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे.

Mitra's assassination from financial debate | आर्थिक वादातून मित्राची हत्या

आर्थिक वादातून मित्राची हत्या

नवी मुंबई : हातातील पैसे खेचल्याच्या कारणावरून मद्यधुंद अवस्थेत एकाने मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सानपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुर्भे येथील रेल्वेपुलाखाली दोघेही मद्यपान करत बसले असताना हा प्रकार घडला.
सफीक शेख (२०), असे मयत तरुणाचे नाव आहे. डोक्यात दगड मारून त्याची हत्या करण्यात आली आहे. त्याच्या हत्ये प्रकरणी अन्सार खान (३४), याला सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही तुर्भे स्टोअर परिसरातले राहणारे असून, मित्र आहेत. गुरुवारी रात्री दोघेही तुर्भे येथील रेल्वेपुलाखाली मद्यपान करत बसले होते. या वेळी सफीक याला पैशाची गरज असल्याने त्याने अन्सार याच्या हातातील ४०० रुपये खेचून घेण्याचा प्रयत्न केला, यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. याच कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले असता, अन्सार याने रस्त्यालगतचा दगड उचलून सफीकच्या डोक्यात मारला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असता, त्याला रुग्णालयात दाखल केले होते; परंतु शनिवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, यामुळे अन्सार खान याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Web Title: Mitra's assassination from financial debate