बेपत्ता निवृत्त अधिकाऱ्याचा लावला शोध
By Admin | Updated: April 25, 2017 01:24 IST2017-04-25T01:24:59+5:302017-04-25T01:24:59+5:30
स्मृतिभ्रंश झाल्याने ७३ वर्षीय सेवानिवृत्त लष्करी अधिकारी घरातून बाहेर पडले होते व बेपत्ता झाले होते. अखेर तीन दिवसांनी

बेपत्ता निवृत्त अधिकाऱ्याचा लावला शोध
पनवेल: स्मृतिभ्रंश झाल्याने ७३ वर्षीय सेवानिवृत्त लष्करी अधिकारी घरातून बाहेर पडले होते व बेपत्ता झाले होते. अखेर तीन दिवसांनी शहर पोलिसांनी त्यांना शोधून काढले आहे.
सुरेश अर्जुनराव बर्गे हे पनवेल येथील निलसिद्धी गार्डन सोसायटी येथे आपल्या मुलीकडे राहण्यास आले होते. बिल्डिंगच्या खाली गार्डनमध्ये जाऊन येतो, असे सांगून ते घराबाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी घरी न परतल्याने ते हरवल्याची तक्र ार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारी होते. त्यांना सतत तीन दिवस शहर परिसर, रेल्वे स्थानक, बस स्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी शोधण्यात आले. मात्र ते सापडले नाहीत.
अखेर ते आदित्य टॉवर या ठिकाणी भरउन्हात एका कोपऱ्यात बसलेले आढळून आले. शहर पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना बोलावून सुरेश बर्गे यांना त्यांच्या ताब्यात देण्यात दिले आहे.
(वार्ताहर)