रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:19 IST2018-03-27T01:19:11+5:302018-03-27T01:19:11+5:30

आई - वडिलांच्या निधनानंतर आजीसह स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची

Minor girl raped by autorickshaw driver | रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नवी मुंबई : आई - वडिलांच्या निधनानंतर आजीसह स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नोकरीवरून घरी पायी जात असताना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाने तिच्यासोबत हे कृत्य करून पळ काढला.
दिघा येथे राहणाºया १६ वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर त्याठिकाणी ती वृध्द आजीसोबत राहायला आहे. परिस्थितीशी लढा देत कसेबसे दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती रबाळे एमआयडीसीमध्ये एका ठिकाणी कॅशिअर म्हणून काम करायची. यादरम्यान घरापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत ती पायी ये-जा करायची. यावेळी एक रिक्षाचालक तिच्यावर नजर ठेवून होता. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने घटनेच्या काही दिवस अगोदर तिला रिक्षातून लिफ्ट दिली होती. त्यानुसार घटनेच्या दिवशी देखील त्याने लिफ्टच्या बहाण्याने तिला रिक्षात बसवले. मात्र दिघ्याच्या दिशेने जाण्याऐवजी रिक्षा अज्ञात ठिकाणी नेवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर घटनेची माहिती कोणाला दिल्यास ठार मारण्याची धमकी देवून घरी सोडण्यासाठी तिला रिक्षात बसवले. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर तिला पुन्हा चालकाच्या हालचालीवर संशय आल्याने चालत्या रिक्षातून उडी मारून तिने स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाअंती पोलिसांनी सदर रिक्षाचालकाची माहिती मिळवली आहे. मात्र त्याने घरातून पळ काढल्यानंतर सतत मुक्कामाचे ठिकाण बदलत असल्याने पोलीस अद्याप त्याच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. परंतु घडलेल्या प्रकारामुळे कौटुंबिक परिस्थितीशी सामना करणाºया पीडित मुलीपुढे हे संकट कोसळले आहे.

Web Title: Minor girl raped by autorickshaw driver