दिघ्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत
By Admin | Updated: January 10, 2016 00:37 IST2016-01-10T00:37:32+5:302016-01-10T00:37:32+5:30
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना दिघा येथे घडली आहे. एका प्रत्यक्षदर्शीमुळे थोडक्यात हा गैरप्रकार टळला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला

दिघ्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत
नवी मुंबई : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना दिघा येथे घडली आहे. एका प्रत्यक्षदर्शीमुळे थोडक्यात हा गैरप्रकार टळला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहील अन्सारी (२२) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो दिघ्याचा राहणारा आहे. शुक्रवारी दुपारी त्याने गवतेवाडी परिसरातील एका पाच वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. सदर मुलगी खेळत असताना साहील तिला पळवून घेऊन चालला होता. या मुलीसह तो डोंगराच्या पायथ्याशी एकांतात जात असल्याचे एका व्यक्तीने पाहिले. त्याने सदर प्रकार मुलीच्या घरच्यांना सांगितला. त्यानुसार मुलीच्या नातेवाइकांसह नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी साहील त्या मुलीसोबत लगट करीत असल्याचे आढळून आले. यावेळी नागरिकांनी त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली. याप्रकरणी नागरिकांनी साहील याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (प्रतिनिधी)