Minor girl arrested for abusing minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

पनवेल : कोळवडी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणा-या आरोपीला तालुका पोलिसांनी अटक केली. अजय गुरुप्रसाद गिरी असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर अपहरण तसेच पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळवडी येथून अजयने अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील गुरव, पोलीस नाईक अमोल कांबळे, महिला पोलीस नाईक शांती कांबळे व पोलीस शिपाई लिंबाजी कायपलवाड यांनी आरोपीचा शोध घेतला तेव्हा तो पुण्याला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार त्याला अटक केली.

Web Title: Minor girl arrested for abusing minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.