सिडकोच्या सफाई कामगारांना किमान वेतन अधिनियम लागू

By Admin | Updated: June 4, 2017 03:50 IST2017-06-04T03:50:07+5:302017-06-04T03:50:07+5:30

सिडको कार्यक्षेत्रात दैनंदिन साफसफाईचे कामे करणाऱ्या सफाई कामगारांना किमान वेतन अधिनियमानुसार वेतनश्रेणी देण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे.

Minimum Wage Act applicable to CIDCO cleaners | सिडकोच्या सफाई कामगारांना किमान वेतन अधिनियम लागू

सिडकोच्या सफाई कामगारांना किमान वेतन अधिनियम लागू

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : सिडको कार्यक्षेत्रात दैनंदिन साफसफाईचे कामे करणाऱ्या सफाई कामगारांना किमान वेतन अधिनियमानुसार वेतनश्रेणी देण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. सिडकोच्या विविध क्षेत्रांत साफसफाईची कामे करणाऱ्या ११७४ कंत्राटी कामगारांना याचा लाभ होणार आहे.
खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, उलवे, द्रोणागिरी, तळोजा, नावडे तसेच काळुंद्रे या विभागांतील दैनंदिन साफसफाईच्या कामांसाठी सिडकोने कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. या कंत्राटदारांच्या माध्यमातून रस्त्यांची साफसफाई, घनकचऱ्याची वाहतूक, स्मशानभूमी देखभाल व स्वच्छता, रेल्वे स्थानके आणि सिडको कार्यालयाची साफसफाई आदी कामे केली जातात. त्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी आवश्यकतेनुसार मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे.
आजमितीस विविध कंत्राटदारांकडे ११७४ कामगार आणि ९ वाहनचालक कार्यरत आहेत. या सर्व कामगारांना किमान वेतन अधिनियमानुसार वेतन मिळावे, अशी कामगार संघटनांची मागणी होती. या मागणीच्या अनुषंगाने सिडकोच्या संचालक मंडळाने किमान वेतनाला मंजुरी दिली आहे. पूर्वी
कर्मचाऱ्यांना मासिक १४,९६८ रुपये इतके वेतन मिळत असे. आता त्यात वाढ होऊन ते १८,८४१ रुपये इतके झाले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्वीच्या मासिक वेतनात ३८७३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १ मेपासून नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे.

Web Title: Minimum Wage Act applicable to CIDCO cleaners