मिनी ट्रेन पर्यटकांच्या दिमतीला
By Admin | Updated: October 18, 2014 22:25 IST2014-10-18T22:25:06+5:302014-10-18T22:25:06+5:30
जगभरातील आबालवृद्ध पर्यटकांची लाडकी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा एकदा नव्या दिमाखात धावू लागली आहे.

मिनी ट्रेन पर्यटकांच्या दिमतीला
विजय मांडे ल्ल कर्जत
जगभरातील आबालवृद्ध पर्यटकांची लाडकी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा एकदा नव्या दिमाखात धावू लागली आहे. पावसाळी सुटीसाठी चार महिने विश्रंतीसाठी नेरळच्या लोकोशेडमध्ये विसावलेली मिनी ट्रेन आपल्या अनेक दशकांच्या शिरस्त्याप्रमाणो हिवाळी पर्यटन हंगामासाठी पुन्हा नेरळ येथून पूजाअर्चा करून रवाना झाली. पुढील आठ महिने नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पर्यटक आणि माथेरानकर यांच्या दिमतीला असणार आहे.
शंभरहून अधिक वयोमान असलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा मार्ग 21 किलोमीटरचा आहे. त्या मार्गावर असलेल्या घाटामध्ये पावासाळय़ात प्रचंड पाऊस असतो, परिणामी दरड कोसळण्याची भीती असते. पावसाच्या पाण्यासोबत दरड मिनी ट्रेनच्या मार्गावर येत असतात. अशावेळी अपघात होण्याची भीती असल्याने ब्रिटिश काळापासून मिनी ट्रेन पावसाळा सुरू होत असताना 16 जूनला विश्रंतीसाठी विसावते. या कालावधीत मिनी ट्रेनच्या मार्गाची दुरुस्ती करण्याचे, इंजिन आणि प्रवासी डब्बे दुरुस्त करण्याचे काम होण्याची अपेक्षा असते. हा शिरस्ता एक शतक सुरू असताना रेल्वेने माथेरान-अमन लॉज अशी शटल सेवा सुरू केल्याने पर्यटक अधिक संख्येने माथेरानच्या पर्यटनाचा आनंद घेत आहेत. मात्न दोनशेहून अधिक वेडीवकडी वळणो घेऊन माथेरानचा घाट पार करताना मिळणारा आनंद काही औरच असल्याने नेरळ- माथेरान मिनी ट्रेनचे तिकीट मिळावे म्हणून काही तास पर्यटक नेरळ किंवा माथेरान स्टेशनवर थांबतात. अशी माथेरानची लाडकी मिनी ट्रेन पावसाळी सुटीनंतर पुन्हा एकदा पर्यटक प्रवाशांच्या दिमतीला आली आहे.
मिनी ट्रेनच्या हंगामातील पहिला दिवस असल्याने पुढील आठ महिने मिनी ट्रेनला कोणतीही विघ्ने येऊ नयेत, म्हणून नेरळ लोकोशेडच्या वतीने चालक, गार्ड, स्टेशन मास्तर,
अभियंता स्टाफ, यांनी पूजाअर्चा केली. सर्व प्रवाशांना पेढे देऊन आनंद साजरा केला. त्या वेळी रेल्वेचे अधिकारी एस़ बी़ वर्मा, अश्विनीकुमार, प्रशात कुमार, चालक माणिकआदी उपस्थित होते.
मिनी ट्रेन सुरू होणार अशी उद्घोषणा नेरळ रेल्वे स्टेशनमध्ये सकाळी सुरू असल्याने माथेरानला जाण्यासाठी निघालेल्या पर्यटक आणि प्रवाशांनी पहिल्या गाडीचे तिकीट मिळावे म्हणून गर्दी केली होती. मिनी ट्रेन सुरू झाल्याने माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम जोरात जाईल, असा विश्वास माथेरानमधील व्यापारी व्यक्त करीत असून, मिनी ट्रेन म्हणजे माथेरान अशी प्रतिक्रिया व्यापारी
दीपक शाह यांनी व्यक्त केली.