काँग्रेस नेत्यांचे मनोमिलन
By Admin | Updated: October 8, 2015 00:51 IST2015-10-08T00:51:21+5:302015-10-08T00:51:21+5:30
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर एकमेकांची तोंड न पाहणारे काँग्रेसचे नेते आगामी नऊ नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ...

काँग्रेस नेत्यांचे मनोमिलन
नवी मुंबई : एमआयडीसीने दिघ्यातील केरू प्लाझा या इमारतीवर बुलडोझर फिरवून ती जमीनदोस्त केली. त्यामुळे या इमारतीत राहणारी जवळपास ६0 कुटुंबे बेघर झाली आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघ्यातील बेकायदा इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईच्या आजच्या तिसऱ्या दिवशी केरू प्लाझा ही सहामजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली.
दिघा परिसरातील ९४ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार २८ सप्टेंबरपासून एमआयडीसीने धडक कारवाई सुरू केली आहे. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस शिवराम अपार्टमेंट आणि पार्वती निवास या दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर बुधवारी केरू प्लाझा इमारत पाडून टाकण्यात आली. (प्रतिनिधी)