शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

स्थलांतरामुळे सात जिल्ह्यांवर वाढला ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 12:16 AM

स्थानिक यंत्रणेवर परिणाम : पोलिसांकडून दिले जाणारे परवाने थांबवले

सूर्यकांत वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉकडाउनमध्ये राज्यांतर्गत स्थलांतरासाठी मिळालेल्या संधीचा फायदा घेत अनेकांनी गावाकडे धाव घेतली आहे. याचा परिणाम अनेक जिल्ह्यांतील लोकसंख्येवर झाल्यामुळे तिथल्या स्थानिक यंत्रणेवर कोरोना नियंत्रणाचा ताण पडू लागला आहे. परिणामी नवी मुंबईसह मुंबईमधून सात जिल्ह्यांत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या पोलिसांकडून थांबवण्यात आल्या आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे आदेश निघताच जिल्ह्यांतर्गत प्रवासाला बंदी घालण्यात आली होती. परंतु महिनाभरापूर्वी पोलिसांच्या परवानगीने राज्यांतर्गत प्रवासाला अनुमती देण्यात आली. त्यानुसार नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबई, नवी मुंबईत स्थायिक असलेल्या मात्र लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबीयांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली.

शहरी भागातून गावाकडे धाव घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने तिथल्या स्थानिक यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. स्थलांतरितांना क्वारंटाइन करण्यासाठी जागेसह कोरोना चाचणीवर त्याचा परिणाम होत आहे. त्याशिवाय महामार्गांवरील रहदारीही वाढत आहे. त्यावर पर्याय म्हणून सात जिल्ह्यांनी नव्याने स्थलांतरितांना परवानगी न देण्याचे पोलिसांना कळवले आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनीदेखील या जिल्ह्यातील गावांकडे जाण्यासाठी येणारे ई-पासचे अर्ज नाकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, नाशिक तसेच कोल्हापूरचा समावेश आहे. तर दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात झाली असून, दिवसाला केवळ ५० परवानग्या दिल्या जात आहेत. मंजूर अर्जांपैकी बहुतांश अर्जदार हे कुटुंबासह गावी गेले आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून तीन लाखाहून अधिकांनी गाव गाठलेले आहे. तर लॉकडाउन सुरू असताना अथवा त्यापूर्वीच कोरोनाच्या भीतीने गाव गाठलेल्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर यासह कोकणातील काही जिल्ह्यांतील व्यक्तींचा समावेश आहे. शिवाय मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवली येथून गावाकडे गेलेल्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी गाव गाठल्याने मागील दोन महिन्यांत संबंधित जिल्ह्यातील लोकसंख्येत भर पडली आहे. याचा परिणाम तिथल्या यंत्रणेवर होऊ लागल्याने नव्याने येणाºयांना जिल्ह्यात प्रवेशबंदी घातल्याचे दिसून येत आहे.

राज्यांतर्गत प्रवास अर्ज अधिकच्मंजूर अर्जामध्ये नवी मुंबई आयुक्तालयांतर्गत देण्यात आलेल्या सुमारे पाच हजारई-पासचा समावेश आहे. उर्वरित अर्जांमध्ये काही प्रमाणात राज्याबाहेरील तर सर्वाधिक राज्यांतर्गत प्रवासाच्या अर्जांचा समावेश आहे.राज्याच्या विविध भागांत जाण्यास लागणाºया पाससाठी नवी मुंबई पोलिसांकडे ३१ मेपर्यंत एकूण ५ लाख ३ हजार ८०७ अर्ज आले आहेत. त्यापैकी १ लाख ३६ हजार ८९९ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विविध कारणांनी ३ लाख ६३ हजार ६०२ अर्ज नाकारण्यात आले असून, १ हजार ३०६ अर्जांची प्रक्रिया प्रलंबित आहे.- प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा