एमआयडीसीचा शटडाऊन रद्द
By Admin | Updated: October 22, 2015 00:27 IST2015-10-22T00:27:14+5:302015-10-22T00:27:14+5:30
एमआयडीसीने पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रत्येक आठवड्यातील गुरुवार व शुक्रवारी ४८ तासांचा शटडाऊन घोषित केला होता. यामुळे एमआयडीसीतील कारखान्यांसह

एमआयडीसीचा शटडाऊन रद्द
नवी मुंबई : एमआयडीसीने पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रत्येक आठवड्यातील गुरुवार व शुक्रवारी ४८ तासांचा शटडाऊन घोषित केला होता. यामुळे एमआयडीसीतील कारखान्यांसह झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना ऐन दसऱ्याच्या दिवशी पाणीपुरवठा होणार नव्हता. सणादिवशीच नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एमआडीसीने नियोजित शटडाऊन रद्द केला असून, याविषयी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.