एमआयडीसीत गोडाऊनवर धाड
By Admin | Updated: October 22, 2015 00:28 IST2015-10-22T00:28:25+5:302015-10-22T00:28:25+5:30
ठाणे - बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील गोडाऊन व कोल्ड स्टोरेजवर शिधावाटप कार्यालयाने धाड टाकण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या

एमआयडीसीत गोडाऊनवर धाड
नवी मुंबई : ठाणे - बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील गोडाऊन व कोल्ड स्टोरेजवर शिधावाटप कार्यालयाने धाड टाकण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या तक्रारीवरून बुधवारी सानपाडाजवळ गोडाऊनची तपासणी करण्यात आली.
मनसेचे शहरप्रमुख गजानन काळे यांनी शिधावाटप कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीवरून अधिकाऱ्यांनी सानपाडामधील अमर युनिव्हर्सल कंपनीवर धाड टाकली. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे साठवणूक केलेल्या मालाची तपासणी सुरू केली. उशिरापर्यंत या मालाचा तपशील तपासला जात असल्याची माहिती शिधावाटप अधिकारी संजय कोळी यांनी दिली आहे. अमर युनिव्हर्सल कंपनीचे प्रमुख अदिल मास्टर यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही चुकीचे काम करीत नाही. व्यापारी जो माल येथे ठेवतात. गोडाऊनमध्ये तूर, चणाडाळ नसल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)