शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्टेशन, एसटी डेपोंसह बेस्ट, एनएमएमटीच्या जागेवर आता पोलिसांना घरे!

By नारायण जाधव | Updated: September 21, 2022 15:53 IST

Police : राज्यात सध्याच्या घडीला पोलिसांसाठी शासकीय निवासस्थानांच्या मोठी कमतरता आहे. यामुळे पोलिसांना दूरवरून प्रवास करून कामाच्या ठिकाणी यावे लागते.

नवी मुंबई : राज्यात आता लवकरच मेट्रो स्टेशन, एसटीच्या डेपोंसह बेस्ट, एनएमएमटी, टीएमटी, पीएमटीसारख्या शहर वाहतूक प्राधिकरणांच्या डेपो विकसित करून त्यांच्या अतिरिक्त जागेवर पोलिसासांठी सेवा निवासस्थाने बांधण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या वाहतूक सेवांच्या जागांवर पोलिसांसाठी किती सेवा निवासस्थाने बांधणे शक्य आहे किंवा नाही, याचा अभ्यास करण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. हे शक्य झाले तर पोलिसांना कामाच्या ठिकाणापासून जवळच शासकीय निवासस्थान मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

राज्यात सध्याच्या घडीला पोलिसांसाठी शासकीय निवासस्थानांच्या मोठी कमतरता आहे. यामुळे पोलिसांना दूरवरून प्रवास करून कामाच्या ठिकाणी यावे लागते. यात त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाया जातो. शिवाय पोलिसांना १२ ड्युटी असल्याने काम करून दूरवरचा प्रवास केल्याने त्यांना अनेकदा शारीरिक व्याधींनी ग्रासले जाते. यामुळे पोलिसांसाठी कामाच्या ठिकाणापासूनच जवळच शासकीय निवासस्थान असावे, यासाठी पोलिसांच्या घरासंदर्भात २७ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. बैठकीत मेट्रो स्टेशनसह एसटी डेपोंसह शहर वाहतूक प्राधिकरणांच्या जागेवर पोलिसांना घरे बांधणे शक्य आहे का, यासाठी समिती स्थापन्याचा निर्णय झाला होता.

या अधिकाऱ्यांचा आहे समिती...गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव नगरविकास, पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, प्रधान सचिव गृह विभाग आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक.

राज्यात पोलिसांसाठी ८२ हजार घरांची गरजसूत्रांच्या माहितीनुसार राज्यात पोलिसांची एकूण मंजूर संख्या दोन लाख ४३ हजार आहे. यापैकी ८२ हजार सेवा निवासस्थानांची पोलिसांना गरज आहे. २०१७ पासून आतापर्यंत ४०६८ निवासस्थाने पोलीस गृहनिर्माणमार्फत हस्तांतरित केलेली आहेत. तर ६४५३ निवासस्थानांची काम प्रगतीपथावर आहेत. शिवाय ११,२९४ सेवा निवासस्थानाचे प्रकल्प पोलीस गृहनिर्माणने प्रस्तावित केले आहेत. तसेच म्हाडाही २७ वसाहतींमधील पोलीस निवासस्थानाचे प्रकल्पांचे पुनर्वसन विचार करीत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसHomeसुंदर गृहनियोजन