म.रे.’च्या प्रसाधनगृहात आता पुरुषांकडूही होणार आकारणी !
By Admin | Updated: February 20, 2015 01:36 IST2015-02-20T01:36:09+5:302015-02-20T01:36:09+5:30
यापुढे नव्याने बांधल्या जाणाऱ्या स्वच्छतागृहांत पुरुष प्रवाशांसाठीही शुल्क आकारणी करण्याचा विचार मध्य रेल्वेकडून केला जात आहे.

म.रे.’च्या प्रसाधनगृहात आता पुरुषांकडूही होणार आकारणी !
‘मुंबई : रेल्वेकडून महिला प्रवाशांना स्वच्छतागृहांचा वापर करताना शुल्क आकारणी केली जात असतानाच यापुढे नव्याने बांधल्या जाणाऱ्या स्वच्छतागृहांत पुरुष प्रवाशांसाठीही शुल्क आकारणी करण्याचा विचार मध्य रेल्वेकडून केला जात आहे. सध्या मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात असणाऱ्या नव्या प्रसाधनगृहात पुरुष प्रवाशांसाठी एक रुपया शुल्क आकारणीला सुरुवात करण्यात आली असून आणखी तीन स्थानकांत तयार होणाऱ्या प्रसाधनगृहासाठीही शुल्क आकारणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेचे महत्त्व प्रवाशांना समजावे हा त्यामागील हेतू असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)