उमेदवारीवर पुरुषांची मक्तेदारी
By Admin | Updated: October 1, 2014 23:12 IST2014-10-01T23:12:53+5:302014-10-01T23:12:53+5:30
रायगड जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकही सक्षम महिला उमेदवार सापडलेला नाही.

उमेदवारीवर पुरुषांची मक्तेदारी
आविष्कार देसाई ल्ल अलिबाग
राजकारणात महिलांना 33 टक्के आरक्षण दिले असले, तरी रायगड जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकही सक्षम महिला उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळे राजकीय पक्ष महिला आरक्षणाच्या निव्वळ गप्पाच मारतात हे त्यानिमित्ताने अधोरेखित होते.
रायगड जिल्हय़ात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिवसेना, भाजपा असे प्रमुख राजकीय पक्ष आहेत. या पक्षांनी आपापल्या संघटनात वाढ करताना पुरुषांना सुरुवातीला स्थान दिले होते. त्यानंतर अलिकडच्या काळामध्ये महिलांचेही संघटन वाढविण्यावर विशेष भर देण्यात आल्याचे दिसून येते. महिलांची ताकद ओळखून प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांच्या विविध संघटना उभ्या केल्या आहेत. या संघटनांचा वापर व्होट बँकेसारखा केला जात आहे. महिलांनी पुढे येण्यासाठी राजकीय पक्षांनी विविध उपाय योजना आखतानाच वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत.
सर्वच क्षेत्रमध्ये महिला आता पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. राजकारणातही महिलांनी पुढे यावे यासाठी महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदार संघातील प्रमुख राजकीय पक्षांना सक्षम महिला उदेवार सापडला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या राजकीय पक्षांच्या भूमिकेवर महिलांनीच संशय निर्माण केल्यास काहीच वावगे ठरणारे नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाच महिलांना पुढे आणण्याची आहे. आताच्या होणा:या निवडणुका या महत्त्वपूर्ण असून अटीतटीच्या आहेत. राजकारणात पक्षहितासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. स्ट्राँग आणि सिनियर उमेदवारांची गरज आहे. येत्या काळात महिलांना निश्चितच संधी मिळेल याबाबत आशावादी आहोत.
-आदिती तटकरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, कोकण संघटक
महिला उमेदवारीचा राजकीय इतिहास
मनोरमा भिडे( काँग्रेस,अलिबाग -1957), शांता कांडकर ( संयुक्त महाराष्ट्र समिती,माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन-1962), मीनाक्षी पाटील (शेकाप, अलिबाग-1995 ते 2क्क्9) रेहाना उंडीरे ( शेकाप,श्रीवर्धन- 1995), मनीषा पळसकर ( राष्ट्रीय समाज,2क्क्4-पनवेल), उषाताई कांबळे (भारीप बहुजन महासंघ-2क्क्9-उरण)
राजकारणात महिला पुढे येत आहेत. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी याची चुणूक दाखविली आहे. त्यामुळे महिलांना एक संधी दिली पाहिजे होती. परंतु पक्षहितासाठी असे निर्णय घ्यावे लागतात.
- वासंती उमरोटकर, काँग्रेस, महिला जिल्हाध्यक्ष