The memory burned down in the park | स्मृती उद्यानात पालापाचोळा जाळला

स्मृती उद्यानात पालापाचोळा जाळला

कळंबोली : उद्यानामधील पालापाचोळ्यातून खतनिर्मिती करणे आवश्यक आहे; परंतु ठेकेदाराकडून येथील कचरा जाळून प्रदूषण केले जात आहे. स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासून प्रदूषण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उद्यानामधील पालापाचोळा जमा करण्याची जबाबदारी उद्यानाची देखभाल करीत असलेल्या ठेकादाराची आहे. यापासून खत तयार करता येते; पण ते न करता त्याच ठिकाणी जाळण्याचा प्रकार होत आहे. कळंबोली सेक्टर २ ई येथील स्मृती उद्यानात गुरुवारी ५ वाजता ठेकेदाराच्या देखभाल करणाºया कामगारांकडून पालापाचोळ्याचे दहा ते पंधरा ढीग करून ते पेटवून दिले. त्यामुळे संपूर्ण उद्यान धुरात हरवले होते. त्याचबरोबर बाजूला असलेल्या एलआयजीतील रहिवाशांना त्याचा त्रास झाला. या कारणाने पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. विशेष म्हणजे, हा पालापाचोळा झाडांच्या खाली जाळण्यात आल्याने वृक्षांनाही हानी पोहोचली. या प्रकारांमुळे नियमांना छेद बसत असून, पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न निर्माण होत आहे. उद्यानांची स्वच्छता, वृक्षांची छाटणी करताना वा अन्य वेळी मोठ्या प्रमाणावर झाडांचा पालापाचोळा पसरतो. मात्र, असा पालापाचोळा जमा करण्यासाठी सिडकोकडे कोणत्याही प्रकारची व्यवस्थाच उपलब्ध करून दिलेली नाही. पालापाचोळा जमा करायचा कसा आणि कुठे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास बंदी घातली आहे; पण यांचा विसर सिडको देखभालीकरिता दिलेल्या ठेकादाराला याबाबत विसर पडला आहे. महिन्यातील दोन ते तीन वेळेस असा पालापाचोळा एकत्रित करून जाळला जात आहे. याकडे सिडको तसेच महापालिका आरोग्य विभाग लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: The memory burned down in the park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.