कासू सब-वेसाठी शुक्रवारी कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक
By Admin | Updated: January 7, 2015 02:01 IST2015-01-07T02:01:25+5:302015-01-07T02:01:25+5:30
दुहेरी ट्रॅकचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली असून पेण ते रोहा टप्प्यातील आप्टा ते कासू या ३४ किलोमीटरच्या दुहेरी ट्रॅकचे काम येत्या महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

कासू सब-वेसाठी शुक्रवारी कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक
मुंबई : दुहेरी ट्रॅकचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली असून पेण ते रोहा टप्प्यातील आप्टा ते कासू या ३४ किलोमीटरच्या दुहेरी ट्रॅकचे काम येत्या महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्यावर भर दिला आहे. कासू येथील सब-वेच्या कामासाठी ९ जानेवारी रोजी मेगाब्लॉकही घेतला जाणार आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
पेण ते कासू आणि कासू ते रोहापर्यंतचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. पेण ते कासू दरम्यानच्या दुहेरी मार्गासाठी मध्य रेल्वेकडून सप्टेंबर २0१४मध्ये पाच तासांचा मेगाब्लॉकही घेण्यात आला होता. यामध्ये तांत्रिक कामे पूर्ण केली गेली.
पेण ते रोहामधील आप्टा ते कासूदरम्यानच्या दुहेरीकरणाचे काम महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कासू ते रोहा या २६ किलोमीटर्सचे काम बाकी राहणार आहे. तेदेखिल लवकरच पूर्ण केले जाईल. कासू येथे सब-वेच्या कामासाठी ९ जानेवारी रोजी पाच ते सहा तासांचा मेगाब्लॉकही घेतला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी पॅसेंजरसह अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या उशिराने धावण्याबरोबरच रद्दही होण्याची शक्यता आहे.