मराठा क्रांती मोर्चासाठी रविवारी रोह्यात बैठक

By Admin | Updated: September 17, 2016 02:13 IST2016-09-17T02:13:17+5:302016-09-17T02:13:17+5:30

खारघर ते कोकणभवन पर्यंत होणाऱ्या मराठा क्र ांती मोर्चासाठी रोह्यात रविवारी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

Meeting on Sunday for the Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चासाठी रविवारी रोह्यात बैठक

मराठा क्रांती मोर्चासाठी रविवारी रोह्यात बैठक

धाटाव/रोहा : खारघर ते कोकणभवन पर्यंत होणाऱ्या मराठा क्र ांती मोर्चासाठी रोह्यात रविवारी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. रोहा तालुक्यातील खेडोपाड्यात असलेल्या सबंध मराठा बांधवांनी या नियोजन बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रोह्यात रविवारी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वा.चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाशेजारच्या जेष्ठ नागरिक सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीकरिता विनोद साबळे, व्ही.टी.देशमुख, नारायण धनवी, तानाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या नियोजन बैठकीसाठी डॉक्टर, इंजिनीयर, वकील, सरकारी, निमसरकारी माजी अधिकारी, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, महिला आदींनी उपस्थित राहण्याचे आवाहन रोह्यातील स्थानिक सकल मराठा समाजाच्या वतीने के ले आहे.

Web Title: Meeting on Sunday for the Maratha Kranti Morcha