सेंट जोसेफमधील पालक सदस्यांची सभा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:00 IST2017-08-01T03:00:38+5:302017-08-01T03:00:38+5:30
नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेत सोमवारी पीटीए (पॅरेंट्स टिचर्स असोसिएशन) सदस्यांची सभा आयोजित करण्यात आली.

सेंट जोसेफमधील पालक सदस्यांची सभा रद्द
पनवेल : नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेत सोमवारी पीटीए (पॅरेंट्स टिचर्स असोसिएशन) सदस्यांची सभा आयोजित करण्यात आली. मात्र ही सभा प्रत्येक इयत्तेनुसार वेगवेगळी घेण्याच्या कारणावरून पालकांनी सभा रद्द करण्यास भाग पडले. या वेळी खांदेश्वर पोलीस व गट शिक्षण अधिकाºयांनी मध्यस्थी केली.
सेंट जोसेफ शाळा प्रशासनाच्या विरोधात पालकांनी मध्यंतरी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यातच शाळेने आरटीईची परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले आहे, तर शिक्षण विभागाने या शाळेची अल्पसंख्याक दर्जाची मान्यता रद्द करण्यासाठी प्रधान सचिवांकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे शाळा वादाच्या भोवºयात सापडली आहे. सोमवारी शाळेने नव्याने निवड होणाºया पीटीए मेंबरची सभा आयोजित केली होती. या वेळी शेकडो पालक उपस्थित होते. मात्र प्रत्येक इयत्तेनुसार पीटीए मेंबर निवडण्याचे ठरवून सर्व पालकांनी १ ली ते १० इयत्तेचे एकत्रित पीटीए मेंबर निवडण्याची मागणी केली. त्यास शाळेने विरोध दर्शवला. त्यामुळे तणावाचे वातावरण होते. एकत्रितपणे पीटीए मेंबरची निवड होत नसल्याने पालकांनी सभाच रद्द करण्याची मागणी केली. अखेरीस शाळेत पोलिसांना पाचारण केले. पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे व पोलिसांच्या मध्यस्थीने सभा पुढे ढकलली.