महापौरांचे आठवलेंना सहकार्यासाठी साकडे
By Admin | Updated: October 30, 2016 02:29 IST2016-10-30T02:29:14+5:302016-10-30T02:29:14+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावानंतर महापौर सुधाकर सोनावणे यांनी लोकशाही वाचवा अभियान सुरू केले आहे. शिवसेना

महापौरांचे आठवलेंना सहकार्यासाठी साकडे
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावानंतर महापौर सुधाकर सोनावणे यांनी लोकशाही वाचवा अभियान सुरू केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची शनिवारी भेट घेतली. अविश्वास ठराव व नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.
महापौर सुधाकर सोनावणे व सभागृह नेते जयवंत सुतार यांनी संविधान बंगल्यावर जावून आठवले यांच्याशी चर्चा केली. आयुक्त मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून केलेल्या कामांची माहीती देण्यात आली. मुंढेंनी पहिल्या दिवसापासून महापौर व इतर लोकप्रतिनिधींची संवाद ठेवला नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये दरी निर्माण झाली व त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होवू लागला. महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी न करता आंबेडकर भवनच्या डोमला मार्बल लावण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. अविश्वास ठराव का आणावा लागला याची माहिती देण्यात
आली.
महापौर व सभागृह नेते यांनी सर्व वस्तुस्थिती सांगितल्यानंतर आठवले यांनीही पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. आवश्यकता भासल्यास यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)