पर्यावरणासाठी महापौरांची सायकल स्वारी

By Admin | Updated: January 20, 2015 00:09 IST2015-01-20T00:09:04+5:302015-01-20T00:09:04+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी मंगळवारी चकक सायकलवरून महापालिका मुख्यालय गाठले.

Mayor's bicycle ride for the environment | पर्यावरणासाठी महापौरांची सायकल स्वारी

पर्यावरणासाठी महापौरांची सायकल स्वारी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी मंगळवारी चकक सायकलवरून महापालिका मुख्यालय गाठले. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करून ‘सायकल चालवा प्रदूषण टाळा’ अशी हाक त्यांनी दिली असताना याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सोमवारी सायकलवरून प्रवास केला.
पर्यावरणातील वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी महापौर पाटील यांनी कोकण युवा प्रतिष्ठान यांच्या साथीने २४, २५, २६ जानेवारीला सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोळसेवाडीतून या सायकल सवारीला त्यांनी प्रारंभ केला. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती नितीन पाटील, कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चाळके, नगरसेवक श्रेयस समेळ, सुनील वायले, विद्याधर भोईर आदी नगरसेवकांनीही यात सहभाग घेतला. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या महासभेला सायकलवरूनच येणार, असे सांगताना एक दिवस तरी प्रदूषणविरहीत वाहन चालवण्याचे आवाहन महापौरांनी केले. (प्रतिनिधी)

ही तर स्टंटबाजी
४महापौरांची सायकल सवारी ही स्टंटबाजी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. गेल्या ४ वर्षांत महापौरांना शहरातील प्रदूषणाची जाणीव झाली नाही का? दररोज त्या सायकलवरून मुख्यालयात येणार का? असे सवाल मनसेचे गटनेते सुदेश चुडनाईक यांनी उपस्थित केले आहेत.
४नजीकच्या काळात येऊ घातलेल्या पालिका निवडणुका पाहता त्यांची ही नौटंकी असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सचिन पोटे यांनी केली आहे.

Web Title: Mayor's bicycle ride for the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.